काेराेनामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये वाढल्या फायब्राेसीसच्या तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 11:13 PM2020-12-16T23:13:39+5:302020-12-17T06:36:25+5:30

पाेस्ट काेविड रुग्णांच्या आराेग्याच्या तक्रारी वाढल्या

Complaints of fibrosis increased among senior citizens due to carina | काेराेनामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये वाढल्या फायब्राेसीसच्या तक्रारी

काेराेनामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये वाढल्या फायब्राेसीसच्या तक्रारी

Next

रायगड :  काेराेना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णसंख्या झपाट्याने खाली येत असली तरी पाेस्ट काेविड रुग्णांच्या आराेग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. 

 व्हेंटिलेटरचा वापर केलेले रुग्ण, रक्तदाब, डायबेटीसच्या रुग्णांसह वयाेवृद्धांना थकवा जाणवणे, दम लागणे अशी लक्षणे दिसत आहेत. काेराेना महामारीच्या विळख्यातून सहीसलामत बाहेर पडलेल्या रुग्णांना आता विविध शारीरिक समस्या जाणवत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक आणि रक्तदाब, डायबेटीस असणाऱ्या रुग्णांचा समावेश आहे. जिल्हा सरकारी रुग्णालयांमध्ये पाेस्ट काेविड सेंटरची व्यवस्था नसली तरी, डाॅक्टर अशा रुग्णांना माेबाइलद्वारे सल्ला देत आहेत. अशा रुग्णांनी सकस आहार घ्यावा, चांगली झाेप घ्यावी, जास्त श्रमाची कामे करू नयेत, व्यायाम करावा, फळे, भाजीपाला यांचा जेवणात समावेश करावा, अशा सूचना डाॅक्टारांकडून करण्यात येत आहेत. 

रुग्ण डाॅक्टारांना थेट संपर्क साधत आहेत आणि आपल्या तक्रारींचा पाढा वाचत आहेत. डाॅक्टरांकडून त्यांना शक्य ते सहकार्य करण्यात येत आहे. यामुळे व्हेंटिलेटरचा वापर केलेले रुग्ण, रक्तदाब, डायबेटीस असणाऱ्या रुग्णांना योग्य मार्गदर्शन मिळत असल्याने दिलासा मिळत आहे. त्यांच्या मनावरील ताण हलका होत आहे.

ज्यांना काेराेना हाेऊन गेला आहे त्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषतः ज्यांच्या फुप्फुसांमध्ये संसर्ग झाला हाेता आणि जे रुग्ण व्हेंटिलेटलवर हाेते त्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. काेणताही आजार अंगावर काढू नये. त्रास झाल्यास तातडीने नजीकच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा.
-  डाॅ. सुहास माने,जिल्हा शल्यचिकित्स,रायगड

थकव्यासह दम लागण्याचा हाेताेय त्रास ज्यांना काेराेना हाेऊन गेला आहे त्यांना आता दम लागणे, थकवा येणे, झाेप न लागणे अशी लक्षणे दिसत आहेत. ज्यांना रक्तदाब, डायबेटीस यांसह अन्य आजार आहेत त्यांना याचा त्रास अधिक हाेत आहे. त्यामध्ये वयस्कर रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे चिंता वाढत आहे. 

वयाेवृद्धांनी काय काळजी घ्यायला हवी
ज्यांना काेराेना हाेऊन गेला आहे अशा व्यक्तींनी सकस आहार घ्यावा. फळे, भाजी-पाला यांचे सेवन करावे. नियमित व्यायाम करावा. श्रम 
हाेणारी कामे टाळावीत. काेणताही त्रास जाणवत असल्यास तातडीने जवळच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा. आणि योग्य उपचार घ्यावेत असा सल्ला आरोग्य विभागाकडून दिला जात आहे.

दिवसाला तीन रुग्ण घेतात डाॅक्टरांचा सल्ला
जिल्हा सरकारी रुग्णालयांमध्ये ‘पाेस्ट काेविड सेंटर’ची उभारणी करण्यात आलेली नाही. मात्र दिवसाला सुमारे तीन रुग्ण तरी डाॅक्टरांना फाेन करून आपल्या तक्रारी सांगत आहेत. डाॅक्टर त्यांना योग्य तो  सल्ला देऊन धीर देण्याचे काम करीत आहेत. काेराेना हाेऊन गेला हाेता आणि आता पुन्हा त्रास जाणवत असल्याने सहा रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांच्याकडे अधिक लक्ष दिले जात आहे. त्यांची नियमित तपासणी केली जात आहे.

Web Title: Complaints of fibrosis increased among senior citizens due to carina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.