शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भाताला १,४६० रुपये हमीभाव

By admin | Updated: October 10, 2015 23:54 IST

खरीप हंगामातील उत्पादित कृषी मालाच्या किमती केंद्र शासनाने जाहीर केल्या असून, ए ग्रेड भाताला प्रतिक्विंटल १,४५० रुपये तर सर्वसाधारण ग्रेड भाताला प्रतिक्विंटल १,४१० रुपये

पेण : खरीप हंगामातील उत्पादित कृषी मालाच्या किमती केंद्र शासनाने जाहीर केल्या असून, ए ग्रेड भाताला प्रतिक्विंटल १,४५० रुपये तर सर्वसाधारण ग्रेड भाताला प्रतिक्विंटल १,४१० रुपये सुधारित आधारभूत किंमत २०१५-१६ या वर्षासाठी जाहीर केल्या आहेत. गतवर्षीच्या आधारभूत किमतीमध्ये ५० रुपये वाढ केली आहे. या वर्षीचा खरीप हंगाम रायगडात समाधानकारक नसून, उत्तर दक्षिण रायगडात शेतीचे चित्र समाधानकारक आहे. सध्या आघाडीची परिपक्व झालेली पिकांची कापणी व झोडणी सुरू असून, परतीचा बेभरवशाचा पावसामुळे कापणी व मळणी एकाच वेळी उरकण्यावर शेतकरी बांधवांचा भर आहे.नवरात्रोत्सवाची घटस्थापना होताक्षणी कापणीचा हंगाम भात शिवारात जोर धरू लागेल. गतवर्षी खरिपात उत्पादित झालेल्या भात हमी खरेदी केंद्राअभावी शेतकऱ्यांना कमी भावात दालालांना विकावा लागला. गतवर्षी ए ग्रेड भाताला प्रतिक्विंटल १,३६० रुपये आधारभूत हमीभाव शासनाने जाहीर केला होता. मात्र भातखरेदी केंद्रच सुरू न केल्याने शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले. १,००० ते ११,००० रुपये प्रतिक्विंटलने शेतकऱ्यांनी दलालांना भात विकला. वर्षभर कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना या पद्धतीने नुकसान होऊनदेखील रायगड व कोकणपट्ट्यातील शेतकरी आपल्या पायावर सक्षमपणे उभा आहे.यावर्षी आधारभूत किमतीमध्ये ५० रुपयांची भर टाकून १,४५० रुपये आधारभूत किंमत जाहीर झालेली असताना शेतकरी यावर समाधानी नाही. बियाणे, खते, मजुरी, किटकनाशके यांच्या वाढलेल्या किमती व उत्पादित होणाऱ्या शेतमालाला उत्पादनावर आधारित आधारभूत किंमत मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. भात खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी फेडरेशनला कृषी व पणन मंडळाने लवकरात लवकर आदेश पारित करावे, जेणेकरून शेतकऱ्यांना आपला कृषी उत्पादित माल या खरेदी केंद्रावर नेता येईल. राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी याबाबतीत अधिक लक्ष द्यावे, अशी शेतकरी वर्गाची मागणी आहे. (वार्ताहर)