शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

बोर्लीपंचतनमधील एटीएमची सेवा ठप्प; तीन दिवसांपासून होतेय नागरिकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 02:00 IST

बोर्ली येथील बँकेत बोर्लीपंचतन, दिवेआगर, वडवली, दिघी, शिस्ते, कापोली, कुडगाव तसेच दांडगुरी आदी गावांतील व्यवहार होतात.

दिघी : श्रीवर्धन तालुक्यात जवळपास सर्वच राष्ट्रीयकृत बँकांनी ‘एटीएम’ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांना चांगली सेवा देण्याकडे मात्र संबंधित बँकांचे दुर्लक्ष होत आहे. तांत्रिक बिघाड, पुरेशा रकमेअभावी वारंवार ‘एटीएम’ मशिन बंद असल्यामुळे ऐन पर्यटन हंगामात ग्राहकांची गैरसोय होत आहे.बोर्ली येथील बँकेत बोर्लीपंचतन, दिवेआगर, वडवली, दिघी, शिस्ते, कापोली, कुडगाव तसेच दांडगुरी आदी गावांतील व्यवहार होतात. तसेच येथे प्रसिद्ध पर्यटनस्थळ दिवेआगर असल्याने येथे राष्ट्रीयकृ तबँक बोर्ली शहरात आहेत. येथे नेहमीच नागरिकांची व पर्यटकांची धावपळ पाहायला मिळते. शहरात दोनच एटीएम आहेत. मात्र, बहुतेक वेळी त्या दोन्ही मशिन शोभेच्या वस्तू बनतात. धावपळीच्या युगात रांगेत उभे राहून बँकेत पैसे काढण्यासाठी बहुतांश नागरिकांकडे वेळ नाही. याशिवाय नोटाबंदीनंतर एकीकडे कॅशलेस व्यवहाराचा वापर वाढावा, यासाठी धोरणे आखली जात असली तरीही प्रत्यक्षात कॅशलेसचे मशिन मात्र फार दूर असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. ‘नव्याचे नऊ दिवस’ बँकेने चांगली सेवा दिली होती; परंतु कालांतराने बँकेच्या सेवेत त्रुटी निर्माण झाल्या. त्यामुळे येथील बँकांच्या ‘एटीएम’ सेवा, ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशीच झाली आहे.बोर्लीपंचतन शहरातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सुविधांची वानवा आहे. एटीएम बंद, बँकेतील असुविधा अधिकारी, कर्मचाऱ्यांची उदासीनता यामुळे ग्राहक त्रस्त आहेत. याबाबत तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याने आहे त्या स्थितीत व्यवहार पार पाडण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. याकडे लक्ष देत बँकांतील असुविधा दूर कराणी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Raigadरायगड