अलिबागमध्ये सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ

By Admin | Updated: December 22, 2016 06:15 IST2016-12-22T06:15:25+5:302016-12-22T06:15:25+5:30

देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी सैनिक आपले बलिदान देतात. अशा सैनिक व माजी सैनिक यांच्या कल्याणासाठी ध्वजदिन

Armed Forces Flag Day funding collection in Alibaug | अलिबागमध्ये सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ

अलिबागमध्ये सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ

अलिबाग : देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी सैनिक आपले बलिदान देतात. अशा सैनिक व माजी सैनिक यांच्या कल्याणासाठी ध्वजदिन निधी संकलनासाठी प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलावा. देशाच्या सीमेचे रक्षण आपले सैनिक करत असतात. म्हणूनच सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वजनिधी संकलनात सहभाग घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. शासकीय विभागानेही त्यांना दिलेला ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन अलिबाग वन विभागाच्या वन संरक्षक जयंती बॅनर्जी यांनी मंगळवारी येथे केले.
रायगड जिल्ह्यातील सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन २०१६ कार्यक्र माचा शुभारंभ अलिबाग वन विभागाच्या वन संरक्षक जयंती बॅनर्जी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कमांडर (निवृत्त) सोपान डोके, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश वऱ्हाडे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक एच.एन. बडे, अ‍ॅड. प्रवीण ठाकूर तसेच विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी रायगड जिल्ह्याने ध्वजदिन निधी संकलनात उत्कृष्ट काम करून इष्टांक पूर्ण केल्याबद्दल अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश वऱ्हाडे यांच्यासह एक लाख रु पये व्यक्तिगत ध्वजदिन निधीसाठी देणगी देणारे अ‍ॅड. प्रवीण ठाकूर यांचा व इतर व्यक्तिगत देणगी देणाऱ्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कमांडर डाके आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: Armed Forces Flag Day funding collection in Alibaug