नळपाणी योजना मंजूर; मात्र कामे संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 11:56 PM2019-11-20T23:56:25+5:302019-11-20T23:56:30+5:30

म्हसळेतील नागरिकांमध्ये संभ्रम; अधिकारी-ग्रामीण पाणीपुरवठा समितीमध्ये समन्वयाची गरज

Approved the drainage scheme; But the works slowly | नळपाणी योजना मंजूर; मात्र कामे संथगतीने

नळपाणी योजना मंजूर; मात्र कामे संथगतीने

Next

- अरुण जंगम 

म्हसळा : तालुक्यातील अनेक गावात नळपाणी पुरवठा योजना अपूर्णावस्थेत आहेत, तर काही गावांत काम प्रगतिपथावर आहेत. त्यामुळे नळपाणी पुरवठा योजनांच्या बाबतीत म्हसळा तालुक्यात ‘कही खुशी कही गम’ असे वातावरण आहे. काही गावांमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचले असले, तरी काही गावांच्या वेशीवर जलवाहिनी पडून आहेत. दुसरीकडे तांत्रिक कारणे दाखवून योजनांच्या फायली लाल फितीत गुंडाळल्या आहेत.

तालुक्यात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल नळपाणी पुरवठा योजना आणि भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत गावागावात नळपाणी योजनांची कामे सुरू आहेत. यामधे १४ गावांच्या योजना प्रगतिपथावर आहेत. त्यापैकी गोंडघर मोहल्ला व काळसुरी नळ योजना विभागीयस्तरावर सादर करून तांत्रिक समितीसमोर सादरीकरण व मंजुरी प्राप्त ई-निविदा स्तरावर आहेत. तर तुरुंबाडी नळ योजनेतील विहीर खोदकाम पूर्ण झाली असून कार्यक्षेत्रात पाइपचा पुरवठा करण्यात आला आहे. सुरई मोहल्ला, मांदाटणे व पानवे नळ योजनेचा कार्यादेश प्राप्त झाले आहे.
खारगाव बुद्रुक योजनेत गुरुत्वीय वाहिनीचे ३३०० मीटरपर्यंतचे काम प्रगतीत आहे. केलटे बाउल कोंड योजनेच्या ऊर्ध्ववाहिनीचे व साठवण टाकीचे तर सोनघर योजनेत पंपघराचे काम प्रगतीत आहे.

रेवळी नळ योजनेची फेर सादरीकरणानंतर मंजुरी प्रलंबित आहे. साळविंडे (वाडांबा) योजनेचे गुरुत्वीय वाहिनीचे काम पूर्ण असून चेंबर प्रगतीत आहे. कोंझरी नळ योजनेबाबत तांत्रिक छाननी समितीसमोर सादरीकरण करण्यात आले आहे. ठाकरोली नळ योजनेची विहीर पूर्ण असून, पंपघर प्रगतीत आहे. वावे नळ योजना ई-निविदा स्तरावर आहे.

भारत निर्माण कार्यक्रम व राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम पाणी पुरवठा सुरू असलेल्या; परंतु आर्थिकदृष्ट्या अपूर्ण योजनांमध्ये सुरई नळपाणी पुरवठा योजना अंदाजपत्रकीय रक्कम ४०.९२ लाख, सुरई बौद्धवाडी योजना अंदाजपत्रकीय रक्कम ५४.८७ लाख, घोणसे निवाची वाडी योजना अंदाजपत्रकीय रक्कम ६२.३१ लाख, अशा तीन योजनांचा समावेश असून त्या पूर्ण करण्याची कार्यवाही सुरू आहे.

आॅक्टोबर २०१९ अखेर पूर्ण झालेल्या नळपाणी पुरवठा योजना
नेवरुळ, लेप, वांगणी, कणघर, जांभूळ, चाफेवाडी, ढोरजे, पांगलोली, केलटे, रुद्रवट, लेप गौळवाडी, वारळ हरिजनवाडी, दगडघुम, म्हसळा गौळवाडी, पाभरे, तोंडसुरे प्रा., देवघर कोंड, खामगाव गौळवाडी, मेंदडी कोंड अशा एकूण ४८४.२४ लाख रकमेच्या नळपाणी योजना पूर्ण झाल्या आहेत. यापैकी नेवरुळ योजनेसंदर्भात ग्रामपंचायत कार्यालयात गटविकास अधिकारी यांच्या सभेमध्ये त्रुटींची पूर्तता करणेबाबत सूचना देण्यात आल्या असून, समिती व ग्रामपंचायतीकडून आवश्यक दाखले अप्राप्त आहेत. तसेच लेप व पांगलोली नळपाणी योजनेबाबत २९ डिसेंबर २०१८ रोजी त्रुटींची पूर्तता करण्यासाठी समितीला सूचना देण्यात आल्या आहेत. लेप गौळवाडी नळपाणी योजना बाबतीत लेखा परीक्षण बाकी आहे.

केलटे बाउल कोंड योजनेच्या ऊर्ध्ववाहिनीचे व साठवण टाकीचे तर सोनघर योजनेत पंपघराचे काम प्रगतीत आहे.
सुरई नळपाणी पुरवठा योजना अंदाजपत्रकीय रक्कम ४०.९२ लाख, सुरई बौद्धवाडी योजना अंदाजपत्रकीय रक्कम ५४.८७ लाख, घोणसे निवाची वाडी योजना अंदाजपत्रकीय रक्कम ६२.३१ लाख, अशा तीन योजना अपूर्ण आहेत.

या योजना अद्याप अपूर्णच
भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत घोणसे वडाचीवाडीतील (विचारेवाडी) नळपाणी पुरवठा योजनेसाठी २००७-८ मध्ये ३९.९० लाखांचा निधी रुपये मंजूर करण्यात आला. या योजनेची अंतिम कार्यवाही सुरू आहे.
सर्वात महत्त्वाची व म्हसळा शहराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असलेली म्हसळा नगरपंचायतच्या कार्यक्षेत्रात येणारी राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम अंतर्गत २००९-१० मध्ये मंजूर करण्यात आलेली १६६.०० लाख रुपयांची योजना तीन वेळा भूमिपूजन करूनही आजही अपूर्ण अवस्थेत आहे.
घोणसे वडाचीवाडी (विचारेवाडी) आणि म्हसळा नळपाणी पुरवठा योजना, अशा दोन मोठ्या एकूण २०७.९० लाखांचा खर्च अपेक्षित असलेल्या योजनाही अपूर्णावस्थेत आहेत.

गावाचे नाव अंदाजपत्रकीय
रक्कम (लाखांत)
गोंडघर मोहल्ला ४८.६९
तुरुंबाडी १३२.००
काळसुरी ११६.००
सुरई मोहल्ला ४४.७०
खारगाव बुद्रुक ३४.७६
मांदाटणे २१.६५
केलटे बाउलकोंड १६.१८
सोनघर ०७.४२
रेवळी २५.००
साळविंडे (वाडांबा) २०.२५
ठाकरोली २१.०९
पानवे २९.८४
वावे ७६.००

Web Title: Approved the drainage scheme; But the works slowly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.