शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
7
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
8
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
9
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
10
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
11
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
12
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
13
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
14
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
15
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
16
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
17
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
18
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
19
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
20
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

भेटीगाठीसोबतच मदतही आटली; आजी-आजोबा एकाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 00:29 IST

वृद्धाश्रमात सुविधा पुरविताना अडचणी

मयूर तांबडेलोकमत न्यूज नेटवर्कनवीन पनवेल : पनवेल तालुक्यातील शांतिवन येथील रामकृष्ण निकेतन वृद्धाश्रमात सध्या २८ ज्येष्ठ नागरिक राहत आहेत. मागील दोन महिन्यांपासून कोरोनाचा उद्रेक झाला असून अनेक माणसे मृत्युमुखी पडत आहेत. अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. अशा वेळी वृद्धाश्रमात असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेतली जात आहे, मात्र मदतीचा ओघ कमी झाल्याने ज्येष्ठ नागरिकांना इतर सुविधा पुरविताना अडचणी येत आहेत.यापूर्वी वृद्धाश्रमात अनेक जण वाढदिवस, विविध उपक्रम राबवीत. मात्र, आता कोरोनामुळे हे सर्व कार्यक्रम बंद झाले आहेत. त्यातच आता वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने इतरांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. अगोदरच कोणी या ठिकाणी जात नव्हते, मात्र सद्यस्थितीत कोरोनामुळे कुणीही मदत करण्यासाठीही पुढे येत नाही. तसेच वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे नातेवाईकही गेल्या काही महिन्यांपासून भेटीस न आल्यामुळे वृद्धाश्रमातील आजी, आजोबा एकाकी पडले आहेत. कोरोनामुळे पनवेलमध्ये दररोज अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे. आपले नातेवाईक सुखाने राहावेत, यासाठी हे ज्येष्ठ नागरिक दररोज प्रार्थना करत आहेत. यापूर्वी वृद्धाश्रमाला भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या बरीच होती. वाढदिवस किंवा इतर कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक संस्था तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणारे नागरिक या वृद्धाश्रमाला भेटी देऊन साहित्याच्या स्वरूपात मदत देत असत. मात्र, कोरोनामुळे आता कोणीही येत नाही. विशेष म्हणजे वृद्धाश्रमानेच बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश नाकारला आहे.वाढदिवस किंवा इतर कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक संस्था तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणारे नागरिक या वृद्धाश्रमाला भेटी देऊन साहित्याच्या स्वरूपात मदत देत असत. मात्र, कोरोनामुळे आता कोणीही येत नाही. 

या महामारीमुळे माणूस माणसात राहिला नाही. प्रत्येक जण जीव वाचविण्यासाठी धडपड करत आहे. परंतु आम्ही या वृद्धाश्रमात खूप आनंदी आहोत. आता हेच आमचे खरे घर आहे. आमच्या कुटुंबीयांचे आमच्या सोबत फोनवर आणि व्हिडिओ कॉलवर बोलणे होते. - वृद्ध महिला

रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीचे नाते खूप चांगले आहे. आज आम्ही एकाकी असलो तरी आमच्या सुख-दुःखाची काळजी घेणारे विनायक शिंदे, प्रमोद ठाकूर, नितीन खंबाटी यांच्यासारखे लोक या ठिकाणी आहेत. - वृद्ध नागरिक पुरुष