नेरळ : नेरळ शहरात तसेच परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनचालकांवर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. तीन महिन्यांत बेशिस्त आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया सुमारे २५० वाहन चालकांवर पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्याकडून सुमारे ५० हजारांचा दंड वसूल केलाआहे.रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाहतुकीचे उल्लंघन करणाºया चारचाकी आणि दुचाकी चालकांवर बेधडक कारवाई करण्यात येत असून त्यांच्याकडून दंडही वसूल केला जात आहे. जिल्ह्यात सर्वत्र वाहतूक शाखेने धडक मोहीम हाती घेतली असून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याचे नवे नवे विक्र म प्रस्थापित केले जात आहेत. जिल्ह्यातील वाहतूक शाखा नाकानाक्यावर नाकाबंदी करून हेल्मेट न घालणे, वाहन वेगाने चालवणे, वाहनांवरून फॅन्सी नंबर प्लेट, बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केली जात आहे.
नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई,२५० वाहनचालकांकडून तीन महिन्यांत ५० हजारांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 03:35 IST