शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

रायगडमधील २५१ गावे कोरोनामुक्त, 13 टक्के नागरिकांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 6:00 PM

टप्प्याने अन्य गावांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

ठळक मुद्देजिल्ह्यातील गावे टप्प्याटप्प्याने कोरोनामुक्त होत आहेत. जिल्ह्यातील १ हजार ९१२ महसूली गावांपैकी २५१ गावे कोरोनामुक्त झाली असून, या गावांमध्ये सद्यस्थितीत एकही कोरोना रुग्ण नाही

रायगड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार, प्रशासनाने राबवलेल्या उपाय योजना आणि नागरिकांनी दिलेला प्रतिसाद कामी आला आहे. रायगड जिल्ह्यातील तब्बल 251 गावे कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आली आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्ण सापडण्याचा सरासरी प्रमाणात आता घट झाली आहे. सध्या 13 टक्के नागरिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे.

जिल्ह्यातील गावे टप्प्याटप्प्याने कोरोनामुक्त होत आहेत. जिल्ह्यातील १ हजार ९१२ महसूली गावांपैकी २५१ गावे कोरोनामुक्त झाली असून, या गावांमध्ये सद्यस्थितीत एकही कोरोना रुग्ण नाही. जिल्ह्यासाठी ही आशादायक चित्र आहे. रायगड जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण सापडत आहेत.‌ सुरुवातीला पनवेल महानगर पालिका हद्दीत कोरोना रुग्ण आढळले. मात्र त्यानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागात काेराेना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली.  ग्रामीण भागातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे प्रशासनासमोर आव्हान आहे. यासाठी प्रशासनाने चांगलीच कंबर कसली. सरकारने लागू केलेले निर्बंध तसेच उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच विविध उपाययोजना राबविण्यात आलेल्या आहेत.

प्रशासनाने राबविलेल्या उपाययोजनांना ग्रामीण भागातील नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील गावे टप्प्याटप्प्याने कोरोना मुक्त होत असल्याचे आशादायक चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यातील ८१० ग्रामपंचायतींमध्ये १ हजार ९१२ महसूली गावे आहेत. त्यामधील १६२ ग्रामपंचायतींमधील २५१ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, सोशल डिस्टसिंगचे पालन‌ करावे, वेळोवेळी सॅनिटायजरचा वापर करावा, गरम पाण्याचा वाफारा घ्यावा, गुळण्या कराव्यात, पात्र नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, कोरोनाची लक्षणे असल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्ण सापडण्याच्या सरासरी प्रमाणात झाली घट

रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रादुर्भाव रुग्ण सापडण्याचे सरासरी प्रमाण कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र दिसून येते. १५ मे रोजी जिल्ह्यात कोरोना चाचणी केलेल्या नगरिकांपैकी १९.५ टक्के नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न होत होते. यामध्ये अत्ता घट झाली हाेत आहे. सध्या तपासणी केलेल्या नागरिकांपैकी १३ टक्के नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न होत आहे.

ग्रामीण भागात राबविलेल्या उपाययोजना

ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सुचविलेल्या उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांवर अॅंटीजन चाचणी करण्यात येत आहे. गावोगावी आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून कोरोना लक्षणे आढळणाऱ्यांची अॅंटीजन चाचणी करण्यात येत आहे. विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांची बाजारपेठ तसेच इतर ठिकाणी अॅंटीजन चाचणी करण्यात येते. या चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रुग्णांवर औषोधपाचार करण्यात येतात. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यांच्या अखत्यारीत असलेल्या उपकेंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. सरकारने केलेल्या सुचांनाची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करण्यात जनतेचा सहभाग महत्वाचा होता. यापुढेही नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करुन आपल्या जिल्ह्यातून कोरोनाला हद्दपार करुया. नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे.

डॉ. किरण पाटील ( मुख्यकार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद)  तालुका :    महसूली गावे : कोरोनामुक्त गावेअलिबाग :        २२२ : ०पेण :             १५६ : ०पनवेल : १४७ : १०उरण : ६३ : ०कर्जत : १७८ : ५खालापूर : १३६ : ४०सुधागड : १०० : २९रोहा : ७३ : २२मुरुड : १७० : ७म्हसळा : १८२ : १९श्रीवर्धन : ५८ : १३माणगांव : ८० : ४९तळा : ७८ : ११महाड : १८३ : २९पोलादपूर : ८६ : १७एकूण : १९१२ : २५१ 

टॅग्स :Raigadरायगडcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस