ZP Election 2026: बारामतीत अजित पवारांच्या आठवणींनी भावनिक वातावरण; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी काटेवाडीत बजावला मतदानाचा हक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 19:49 IST2026-02-07T19:49:23+5:302026-02-07T19:49:55+5:30

ZP Election 2026 कोणत्याही पक्षाने अजित पवार यांच्या निधनामुळे प्रचार सभा घेतलेली नाही, प्रचार सभांशिवाय पार पडलेली बारामतीच्या इतिहासातील ही पहिलीच निवडणुक आहे

ZP Election 2026 Emotional atmosphere in Baramati due to memories of Ajit Pawar; Deputy Chief Minister Sunetra Pawar exercised her right to vote in Katewadi | ZP Election 2026: बारामतीत अजित पवारांच्या आठवणींनी भावनिक वातावरण; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी काटेवाडीत बजावला मतदानाचा हक्क

ZP Election 2026: बारामतीत अजित पवारांच्या आठवणींनी भावनिक वातावरण; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी काटेवाडीत बजावला मतदानाचा हक्क

बारामती : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शनिवारी(दि ७) सकाळी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी राज्यातील सर्व नागरिकांना आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी लोकशाहीच्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेत मतदान करण्याचे आवाहन केले.

मतदानाला जाण्यापूर्वी राज्याच्या उपमुख्यमंत्री पवार यांनी राज्याचे दिवंगत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी अजितदादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून नतमस्तक होत श्रद्धांजली अर्पण केली. दादांनी राज्याच्या राजकारणात दिलेले योगदान आणि जनतेशी असलेली नाळ कायम स्मरणात राहील, अशा भावना यावेळी व्यक्त केल्या.यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्यासमवेत पार्थ पवार, श्रीनिवास पवार, शर्मिला पवार, युगेंद्र पवार यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. दिवंगत उपमुख्यमंत्री पवार यांच्याप्रमाणे त्यांनी भल्या सकाळी येत मतदान करत दिवंगत उपमुख्यमंत्री पवार यांचा भल्या सकाळी मतदान करण्याचा शिरस्ता कायम राखला. तसेच पिंपळी येथे आमदार रोहित पवार, त्यांच्या पत्नी कुंती पवार, राजेंद्र पवार, सुनंदा पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला.

बारामतीत तालुक्यात ६ जिल्हा परीषद गट आणि १२ पंचायत समिती गणांसाठी निवडणुकीत २९९ मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. जिल्हा परीषद गटात एकुण ३१ ,तर १२ गणांमध्ये ४३ उमेदवार निवडणुकीच्या रींगणात आहेत. यामध्ये तालुक्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि भाजपमध्ये प्रमुख लढत होत आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशिवाय बारामती तालुक्यात पार पडणारी जिल्हा परीषद आणि पंचायत समितीची हि गेल्या ४० वर्षातील पहिलीच निवडणुक आहे. कोणत्याही पक्षाने अजित पवार यांच्या निधनामुळे प्रचार सभा घेतलेली नाही. प्रचार सभांशिवाय पार पडलेली बारामतीच्या इतिहासातील हि पहिलीच निवडणुक आहे. शनिवारी बारामतीच्या मतदारांमध्ये अजित पवार यांच्या आठवणींनी भावनिक वातावरण दिसुन आले. तसेच मतदारांमध्ये निरुत्त्साहाचे वातावरण होते. बहुतांश मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी झाल्याचे चित्र आहे. सकाळी ९.३० पर्यंत बारामती तालुक्यात अवघे ६.५२ टक्के मतदान झाले होते.दुपारी ११.३० पर्यंत १६.९१ टक्के मतदान झाले.तर दुपारी १.३० वाजेपर्यंत ३४.५८ टक्के मतदान झाले.दुपारी ३.३० वाजेपपर्यंत हे मतदान अवघे ४०.८५ टक़्के झाले.

Web Title : बारामती जेडपी चुनाव: सुनेत्रा पवार ने वोट डाला; अजित पवार याद आए।

Web Summary : बारामती जेडपी चुनाव में सुनेत्रा पवार ने अजित पवार को श्रद्धांजलि देते हुए मतदान किया। कम मतदान, भावनात्मक माहौल दिखा। एनसीपी, बीजेपी का मुकाबला।

Web Title : Baramati ZP Election: Sunetra Pawar votes; Ajit Pawar remembered.

Web Summary : Sunetra Pawar voted in Baramati ZP elections, honoring Ajit Pawar. Low voter turnout, emotional atmosphere marked the polls. NCP, BJP face off.