शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेची घरपट्टीवाढीला हरकत

By admin | Updated: August 6, 2015 03:46 IST

ग्रामीण भागातील घरांसाठी चौरस फुटांऐवजी मूल्यांकनावर किंवा भांडवली मूल्यांवर घरपट्टी आकारण्याचा घाट शासन घालत असल्याने शहरापेक्षाही

पुणे : ग्रामीण भागातील घरांसाठी चौरस फुटांऐवजी मूल्यांकनावर किंवा भांडवली मूल्यांवर घरपट्टी आकारण्याचा घाट शासन घालत असल्याने शहरापेक्षाही जास्त घरपट्टी ग्रामीण भागात आकारली जाणार आहे. पाच ते सहापट जास्त पैैसे घरमालकांना यामुळे मोजावे लागणार आहेत, याला जिल्हा परिषदेने आज स्थायी समतिीत ठराव करून विरोध केला आहे.शासनाने एक अधिसूचना काढून २०१५-१६ साठी मूल्यांकनावर घरपट्टी आकारणीचा प्रस्ताव तयार केला आहे. यानुसार करआकारणी केल्यास आरसीसी पद्धतीच्या ६०० चौरस फुटाच्या घराचे मूल्य साधारण ९ लाख ८२ हजार होते. याला १०० रुपयांना ७५ पैसे आकारणी केल्यास मूल्यांकनानुसार ७ हजार ३६५ रुपये घरपट्टी बसेल. जुन्या पद्धतीनुसार (क्षेत्रफळानुसार) याच घराला १ हजार ८०० रुपये बसत होते. म्हणजे याच घरमालकाला नव्या प्रणालीनुसार ५ हजार ५६५ रुपये जास्त घरपट्टी बसणार आहे.‘काँक्रीटच्या घरांवर घरपट्टीवाढीचा हातोडा’ हा विषय आज (दि. ५) ‘लोकमत’ने प्रसिद्ध केला. याची दखल घेऊन आज झालेल्या जिल्हा परिषद स्थायी समितीत हा विषय अवलोकनार्थ मांडण्यात आला. शासनाच्या या निर्णयाला जिल्हा परिषदेच्या सर्वच सदस्यांनी विरोध दर्शविला. घरपट्टीवाढीचा हा बोजा आंम्हाला परवडणार नाही. आम्ही घरपट्टी भरणार नाही, असे ठाम मत सर्वांनी मांडले. त्यामुळे विरोधाचा ठराव करण्यात आला. ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तसा ठराव करून तो शासनास तत्काळ पाठविण्याच्या सूचनाही या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी केल्या आहेत. (प्रतिनिधी)