शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी दहशतवादी काश्मीरमध्ये घुसले; छावण्या, रेल्वेवर हल्ल्याची भीती, लष्कर सतर्क
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२४ : घरात सुखशांती नांदेल, शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील
3
WI vs NZ : ६ षटकार! न्यूझीलंडचा सांघिक खेळ; पण वेस्ट इंडिजकडून एकट्याने किल्ला लढवला
4
T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : भारताची विजयी हॅटट्रिकसह Super 8 मध्ये एन्ट्री; सूर्यकुमार, शिवम यांच्या संयमी खेळीमुळे मारली बाजी
5
वैष्णोदेवीला जाणाऱ्यांवर दहशतवादी हल्ला; पाकिस्तानी खेळाडूने केला निषेध, म्हणाला...
6
सूड उगविण्यासाठी अभिनेत्रीनेच केले प्रवृत्त, अश्लील कमेंटमुळे दर्शन चिडला अन्..., धक्कादायक गौप्यस्फोट
7
पुरुषांना १०० तर महिलांना ४० रुपये! वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्समध्ये भारतातील वेतनाची स्थिती आली समाेर
8
विश्वचषक पात्रता स्पर्धा; ‘त्या’ वादग्रस्त गोलची चौकशी करा! भारतीय फुटबॉल महासंघाची मागणी
9
दागिन्यांच्या मुक्त आयातीवर बंदी, आभूषणे आणण्यासाठी घ्यावी लागणार केंद्र सरकारची परवानगी
10
पाकिस्तानमध्ये गाढवांची संख्या वाढली, २०२३-२४ च्या आर्थिक सर्वेक्षणातील निष्कर्ष
11
दस्तावेज कमी असल्याने विमा दावा नाकारू नका, विमा प्राधिकरणाने कंपन्यांना दिली ताकीद
12
"चार महिन्यात सत्तांतर होणार, नेतृत्व ठाकरेंकडे जाणार"; संजय राऊतांचा हल्लाबोल
13
IND vs AUS : टीम इंडिया पराभवाचा वचपा काढणार? IND vs AUS 'सुपर' लढत होण्याची शक्यता
14
T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : अम्पायरचा 'तो' सिग्नल अन् टीम इंडियाला मिळाल्या ५ धावा! ICC चा नवा नियम मदतीला धावला 
15
"बारामतीची जागा अपक्ष १ हजार टक्के जिंकली असती"; विजय शिवतारेंचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला; तीन दिवसांत चौथ्यांदा चकमक
17
लोकसभेनंतर आता राज्यसभा निवडणुकांची रणधुमाळी; 'या' 10 जागांसाठी होणार मतदान...
18
video: अयोध्येत भाजपचा पराभव का झाला? राहुल गांधींनी सांगितले कारण, पाहा...
19
४-०-९-४! अर्शदीप सिंगने अमेरिकेविरुद्ध ५ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले; झहीर खानलाही मागे टाकले
20
"रामदास कदमांचे पार्सल परत पाठवून देणार"; माजी आमदार संजय कदम यांची टीका

पुरंदरमध्ये मराठा आरक्षणासाठी रेल्वेखाली उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 4:35 PM

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यभर आंदोलन पेटले असताना काही ठिकाणी आत्महत्येचे सत्र सुरु आहे.

ठळक मुद्देखिशात सापडलेल्या चिठ्ठीत आपण मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आत्महत्या करणार असल्याचा उल्लेख पिंगोरी हे गाव सैनिकांचे गाव

पुरंदर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यभर आंदोलन पेटले असताना काही ठिकाणी आत्महत्येचे सत्र सुरु आहे. याचे लोण आता थेट पुणे जिल्हयापर्यंत पोहचले असून पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील तरुणाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी घडली. दत्तात्रय तुकाराम शिंदे (वय ३४, सध्या रा.सासवड) असे या तरुणाचे नाव आहे.जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  मयत दत्तात्रय शिंदे यांनी पुणे -कोल्हापूर लोहमार्गावरील दौडज खिंडीत रेल्वेखाली शुक्रवारी (दि.३) सकाळी ६:२२ वाजण्याचे सुमारास आत्महत्या केली. याबाबत रेल्वे स्टेशनमास्टर विवेक यादव यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात खबर दिली. खबरीनुसार जेजुरी पोलिसांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेतला. मृत शिंदे यांचे खिशात सुसाईड नोट मिळाली असून या सुसाईड नोट मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण तत्काळ मंजूर करावे अन्यथा ५ ऑगस्ट रोजी नीरा नदीत जलसमाधी घेणार आहे. माझ्या आत्महत्येस सर्वस्वी आपणच जबाबदार असाल असा मजकूर असलेली नोट मिळून आली आहे. पिंगोरी हे गाव सैनिकांचे गाव आहे. कारगिल युद्धातील पहिले शहीद शंकर शिंदे यांचे हे गाव. याच गावातील मराठा आरक्षणासाठी पुणे जिल्ह्यातील पहिला बळी गेल्याने पिंगोरी, वाल्हे परिसरातून अत्यंत हळहळ व्यक्त होत आहे. मयत दत्तात्रय शिंदे यांचेमागे चार वर्षाचा मुलगा, गर्भवती पत्नी, आई, एक अविवाहित भाऊ असा परिवार असून ते घरातील एकमेव कमावती व्यक्ती असल्याचे समजते. याप्रकरणी जेजुरी पोलीस पुढील तपास करत आहे.

टॅग्स :PurandarपुरंदरDeathमृत्यूmarathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षणPoliceपोलिस