खराबवाडी येथे सापळा लावून तरुणास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:23 IST2021-09-02T04:23:02+5:302021-09-02T04:23:02+5:30

चाकण : बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट ३ च्या पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. ...

Youth arrested for setting a trap at Kharabwadi | खराबवाडी येथे सापळा लावून तरुणास अटक

खराबवाडी येथे सापळा लावून तरुणास अटक

चाकण : बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट ३ च्या पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई रविवारी (दि. २९) खराबवाडी येथील वाघजाई नगर भागात करण्यात आली.

अभिनव राजबहादूर वती (वय २६, सध्या रा. नाणेकरवाडी, ता. खेड, जि. पुणे ) असे अटक करण्यात आलेल्या परप्रांतीय युवकाचे नाव आहे. वाघजाईनगर फाटा, खराबवाडी येथे एक जण पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई करत अभिनवकुमार याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले.

Web Title: Youth arrested for setting a trap at Kharabwadi