तरुणाला सक्तमजुरी

By Admin | Updated: July 24, 2014 23:34 IST2014-07-24T23:34:35+5:302014-07-24T23:34:35+5:30

सलूनच्या दुकानातील टॉवेलने तोंड पुसल्यावरून दोघांवर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी सत्र न्यायाधीश बी. एम. सरदेशपांडे यांनी एका युवकास 3 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

Young man's hard work | तरुणाला सक्तमजुरी

तरुणाला सक्तमजुरी

पुणो : सलूनच्या दुकानातील टॉवेलने तोंड पुसल्यावरून दोघांवर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी सत्र न्यायाधीश बी. एम. सरदेशपांडे यांनी एका युवकास 3 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच त्यास दीड हजार रुपये दंडही सुनावला आहे. 
रामा ऊर्फ राम साहेबराव साठे (वय 22, रा. निगडी) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी फिरोज साजिद शेख (वय 23, रा. निगडी, मूळ रा. उत्तर प्रदेश) याने फिर्याद दिली              आहे. 
या खटल्यात सरकारी वकील सुनील मोरे यांनी 8 साक्षीदार तपासले. (प्रतिनिधी)
 
4फिर्यादी यांचा निगडी येथे सलूनचा व्यवसाय आहे. ते त्यांच्या वडिलांसह 14 जानेवारी 2क्13 रोजी सलूनच्या दुकानात काम करत होते. 
4या वेळी आरोपीने दुकानात येऊन चेह:यावर पाणी मारले आणि दुकानातील टॉवेलनेच तोंड पुसले. त्यामुळे टॉवेल का खराब केला, असा जाब फिर्यादीने आरोपीस विचारला. 
4या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपी तेथून बाहेर पडला आणि थोडय़ा वेळाने येऊन फिर्यादीच्या डोक्यावर आणि त्यांच्या वडलांच्या पोटात चाकू भोसकून गंभीर जखमी केले. या खटल्यात फिर्यादी व त्याचे वडील यांची साक्ष आणि वैद्यकीय पुरावा महत्त्वाचा ठरला. 

 

Web Title: Young man's hard work