टोळक्‍याकडून वार झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू; तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:13 IST2021-08-14T04:13:58+5:302021-08-14T04:13:58+5:30

पुणे : जुन्या वादातून टोळक्‍याने तरुणावर कोयत्याने वार करून त्याला जखमी केले होते. गुरुवारी (दि. १२) रात्री अकरा ...

A young man killed by a mob during treatment; Three arrested | टोळक्‍याकडून वार झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू; तिघांना अटक

टोळक्‍याकडून वार झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू; तिघांना अटक

पुणे : जुन्या वादातून टोळक्‍याने तरुणावर कोयत्याने वार करून त्याला जखमी केले होते. गुरुवारी (दि. १२) रात्री अकरा वाजता ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तिघांना अटक केली.

कार्तिक जाधव (वय २२, रा. कोंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक जाधव हा कोंढव्यातील रहिवासी आहे. त्याच्यावर यापूर्वीच एका व्यक्तीच्या खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्याची यापूर्वी काही तरुणांशी भांडणे झाली होती. दरम्यान, कार्तिक हा गुरुवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास येवलेवाडी परिसरात आला होता. त्यावेळी टोळक्‍याने त्याच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी त्यास तत्काळ ससून रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री त्याचा मृत्यू झाला.

........

Web Title: A young man killed by a mob during treatment; Three arrested