तरुणाची अकराव्या मजल्यावरून उडी; एमपीएससी परीक्षेत यश मिळत नसल्याने संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 18:08 IST2025-05-27T18:04:22+5:302025-05-27T18:08:23+5:30
ऋषिकेश राक्षे हा एमपीएसीचा अभ्यास करत होता, त्याला यश येत नसल्याने तो मानसिक तणावात होता

तरुणाची अकराव्या मजल्यावरून उडी; एमपीएससी परीक्षेत यश मिळत नसल्याने संपवले जीवन
राजगुरूनगर: २७ वर्षीय तरुणाने इमारतीच्या ११ व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. यात त्यांचा जागीच मूत्यू झाला. ही धक्कादायक घटना सोमवारी २६ मे रोजी राक्षेवाडी (ता खेड ) येथील आशानंद सोसायटीत घडली. ऋषिकेश शांताराम राक्षे ( वय २७ रा. बहिरवाडी ता. खेड ) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश राक्षे हा एमपीएसीचा अभ्यास करत होता. त्याला यश येत नसल्याने तो मानसिक तणावात होता. तो राजगुरुनगर शहरालगत राक्षेवाडी येथे बहिणीकडे आला होता. अशानंद सोसायटी लगतच असणाऱ्या नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून ऋषिकेशने उडी मारली.उंचावरुन वेगाने जमिनीवर आदळल्यामुळे जागीच मूत्यू झाला. झाले. स्थानिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.