शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

युवा चेहऱ्यांबरोबरच अनुभवींना संधी देणार

By admin | Updated: March 22, 2015 23:03 IST

सध्या साखर धंदा अडचणीतून वाटचाल करीत आहे. त्यामुळे युवा चेहऱ्यांबरोबरच काही अनुभवी संचालकांना देखील संधी दिली जाईल.

भवानीनगर : सध्या साखर धंदा अडचणीतून वाटचाल करीत आहे. त्यामुळे युवा चेहऱ्यांबरोबरच काही अनुभवी संचालकांना देखील संधी दिली जाईल. नव्या जुन्यांचा मिलाफ केला जाईल. संधी न मिळाल्यास इतर अनुभवींनी थांबण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. भवानीनगर (ता. इंदापूर) येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात पवार बोलत होते. दरम्यान, पवार यांनी केंद्र, राज्य सरकारसह शेतकरी संघटनेवर चौफेर टिका केली. ते म्हणाले, साखर कारखानदारी अडचणीत सापडली आहे. शेतकरी बुडला तर राज्य बुडेल, याबाबत आमदार भरणे यांच्यासह आपण मांडलेल्या लक्षवेधीवर अधिवेशनामध्ये बोलणार आहोत. अडचणीतील साखर धंद्याबाबत शेतकरी संघटना बोलायला तयार नाहीत. बारामती शहरातील शारदा प्रांगणाला तर ‘आंदोलनाचे प्रांगण’ असे स्वरूप आले होते. आता मात्र, ते रस्ते अडवत नाही किंवा आंदोलने करीत नाहीत. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह घोलप यांची भाषणे झाली. यावेळी ‘छत्रपती’चे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, मारुतराव चोपडे, जालिंदर कामठे, प्रशांत काटे, आप्पासाहेब जगदाळे, प्रदीप गारटकर, भाऊसाहेब करे, विठ्ठल निंबाळकर, संभाजी होळकर, रामचंद्र निंबाळकर, तुकाराम काळे, सचिन सपकळ आदी उपस्थित होते.(वार्ताहर)उमेदवारी अर्जाची छाननी झाल्यावर मुलाखती, चर्चा होईल. आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांची चर्चा करून अंतिम यादी निश्चित केली जाईल. त्यामध्ये युवा, अभ्यासू संचालकांबरोबरच अनुभवींना संधी दिली जाईल. यंदा अर्ज माघारी घेण्याचा अर्ज घेतला जाणार नाही. जय भवानी पॅनलची उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर उर्वरित इच्छुकांनी मनाचा मोठेपणा दाखवून अर्ज माघारी घ्यावेत. साखरेवर नियंत्रण असताना दर देखील नियंत्रित होते. नियंत्रणामुळे बाजारपेठेत अधिक साखर येत नव्हती. ऊसबाबत होणाऱ्या अफवा, चर्चांवर सभासदांनी विश्वास ठेवू नये. गाळप क्षमता वाढविल्यानंतर कार्यक्षेत्रातील ऊस बाहेर जाऊन दिला जाणार नाही. - अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री