शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही फक्त प्रवेश द्या, आम्ही शिकवतो

By admin | Updated: July 26, 2014 00:29 IST

पुण्यातील शिक्षणक्षेत्रभोवतीचा खासगी कोचिंग क्लासचा (शिकवणी) विळखा घट्ट होत असून, आता थेट महाविद्यालयांबरोबर छुपा करार करण्यार्पयत काही क्लासचालकांची मजल गेली आहे.

राजानंद मोरे ञ पुणो
पुण्यातील शिक्षणक्षेत्रभोवतीचा खासगी कोचिंग क्लासचा (शिकवणी) विळखा घट्ट होत असून, आता थेट महाविद्यालयांबरोबर छुपा करार करण्यार्पयत काही क्लासचालकांची मजल गेली आहे. ‘तुम्ही फक्त विद्याथ्र्याना प्रवेश द्या; शिकवण्याचे काम आम्ही करतो,’ अशा स्पष्ट शब्दांत काही शिकवण्या महाविद्यालयांना यासाठी तयार करीत आहेत. एका महाविद्यालयाच्या प्राचार्यानीच ‘लोकमत’शी बोलताना या धक्कादायक प्रकाराची माहिती दिली. 
पुणो विद्यार्थी गृहाच्या महाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य दीपक वाघ यांना अशाच प्रकारच्या छुप्या कराराची ‘ऑफर’ देण्यात आली होती. एका शिकवणीमधून याबाबत विचारणा करण्यात आली होती; मात्र आम्ही त्यास पूर्णपणो नकार दिला. त्यानंतर शिकवणीचालक वरिष्ठांकडे गेले. तिथेही त्यांना ठामपणो नकार देण्यात आला, असा अनुभव वाघ यांनी ‘लोकमत’ला सांगितला.
अकरावी व बारावीच्या विज्ञान शाखेतील विद्याथ्र्याना आपल्या शिकवणीमध्ये घेण्यासाठी थेट महाविद्यालयांशी ‘छुपा’ करार केला जात आहे. त्यासाठी महाविद्यालयांकडून विद्याथ्र्याना वर्गात हजेरीसाठी सवलतही मिळविली जात आहे. ‘करिअरच्या दृष्टीने बारावीचे ओङो थोडेफार हलके करण्यासाठी पुण्यात गल्लोगल्ली उभारण्यात आलेल्या खासगी शिकवण्यांचा आधार घेतला जातो. मुलगा अकरावीला गेला की विज्ञान शाखेतील गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या मुख्य विषयांसाठी हजारो रुपये भरून या शिकवण्या लावल्या जातात. त्यासाठी भरमसाट शुल्कही आकारले जाते. या शिकवण्या लावलेले अनेक विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालयातील वर्गाला दांडी मारताना दिसतात. काही महाविद्यालयांतील शिक्षकही खासगी शिकवण्या घेतात. त्यामुळे वर्गात हजर राहण्यापासून विद्याथ्र्याना सवलतही मिळते. त्यासाठी विद्यार्थी अशा ठिकाणी प्रवेश घेतात.
 
च्विज्ञान शाखेतील 8क् ते 9क् टक्के विद्यार्थी खासगी शिकवण्यांकडे जात असतात. त्यामुळे वर्गातील दररोजची उपस्थिती खूप कमी असते. केवळ प्रात्यक्षिकांनाच काही विद्यार्थी येतात. यावर महाविद्यालयही काही करीत नाही.
च्प्रात्यक्षिकांच्या उपस्थितीवर तडजोड करीत त्यांचा हजेरीपट भरला जातो. नियमानुसार शैक्षणिक वर्षात दोन्ही सत्रंत प्रत्येकी 75 टक्के हजेरी असणो अनिवार्य आहे. मात्र, त्याकडे काही महाविद्यालयांकडूनही दुर्लक्ष केले जाते. 
च्याला खासगी शिकवण्यांचे वाढलेले प्रमाणच कारणीभूत असून, त्यामध्ये काही महाविद्यालयेही सक्रिय असल्याचे शहरातील एका प्रसिद्ध महाविद्यालयातील प्राध्यापकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
 
शिकवण्यांचा आधार
शहरातील काही महाविद्यालये व खासगी शिकवण्यांमध्ये अशा प्रकारे अलिखित करार केला जातो. महाविद्यालयाचा निकाल वाढावा, यासाठी महाविद्यालये असे करीत असतील. मात्र, त्यामध्ये संबंधित महाविद्यालये आपल्याच शिक्षकांच्या गुणवत्तेवर अविश्वास दाखवत आहेत. यामध्ये काही शिकवणीवाले विद्याथ्र्याकडून भरमसाट पैसे घेत असल्याने त्यांचा दुहेरी फायदा होत आहे. काही महाविद्यालयांमध्ये आवश्यक सोयी तसेच पुरेसे शिक्षक नसल्यानेही ती शिकवण्यांचा आधार घेतात.