शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

शहरात स्पर्धात्मक योगासनाला वाढीचा ‘योग’

By admin | Updated: June 21, 2016 00:14 IST

व्याधी, रोग, आजारावर मात करण्याबरोबरच मनस्वास्थ्य, शारीरिक तंदुरुस्तीसाठी योग अभ्यास केला जातो. याचबरोबर स्पर्धात्मक योगासनामुळे शहरात योगासन हा क्रीडाप्रकार झपाट्याने वाढत आहे

पिंपरी : व्याधी, रोग, आजारावर मात करण्याबरोबरच मनस्वास्थ्य, शारीरिक तंदुरुस्तीसाठी योग अभ्यास केला जातो. याचबरोबर स्पर्धात्मक योगासनामुळे शहरात योगासन हा क्रीडाप्रकार झपाट्याने वाढत आहे. पाच वर्षांच्या बालकापासून ८० वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत नियमितपणे योगासन करणारे शेकडो साधक तयार झाले आहेत. ही संख्या वाढतच असल्याचे सकारात्मक चित्र असून, योगासनाकडे स्पोटर््स करिअर म्हणून पाहिले जात असल्याचे योगतज्ज्ञांचे मत आहे. जागतिक योग दिनानिमित्त योगासन क्रीडाप्रकाराबाबत त्या क्षेत्राचा आढावा घेण्यात आला. त्यात ही बाबसमोर आली. भारतीय संस्कृतीतील योगाचा प्रसार वाढत असल्याचे अभिमानास्पद बाब समोर आली आहे.एखाद्या आजारावर मात करण्यासाठी योगासन करण्यावर पूर्वी भर दिला जात होता. मात्र, शालेय, महाविद्यालयीन, विद्यापीठ, अखिल भारतीय योगासन महासंघातर्फे घेण्यात येणाऱ्या योगा स्पर्धामुळे स्पर्धात्मक योगासनाकडे कल अधिक वाढला आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सरावात सातत्य गरजेचे असते. त्यासाठी कठोर मेहनत घेण्याची तयारी लागते. नियमित साधारण दोन तास सराव करीत अवघड, नावीन्यपूर्ण आणि लयबद्ध असा योगाचा सराव केला जातो. स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली जात आहे. वय वर्षे ८ ते ७० वर्षांवरील प्रौढ असे महिला व पुरुष विविध गट आहेत. प्रत्येक गटात स्पर्धा वाढून पदक जिंकण्यासाठी ईर्षा वाढली आहे. पुणे, मुंबईपाठोपाठ इतर जिल्ह्यांतील खेळाडूही आपली चमक दाखवत आहेत. राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत पुणे संघाच्या आर्किस्टिक योगासन प्रात्यक्षिकासह मोठी दाद मिळत आहे. केवळ १० मिनिटांत तब्बल ३२५ अवघड आसने सादर करून पथकाने वाहवाह मिळविली आहे. स्पर्धात्मक सराव आणि प्रशिक्षण देणाऱ्या शहरात तीनपेक्षा अधिक प्रमुख संस्था असून, शहरातील वेगवेगळ्या भागांत असंख्य शाखा आहेत. पुणे जिल्हा योग संस्थेच्या माध्यमातून २००३पासून पुणे जिल्हा संघाची स्पर्धा घेण्यास सुरुवात झाली. मनोज काळे, रमेश मांडवकर, रमेश भालेकर, विवेक साबळे, चंद्रकांत पांगारे, मनाली घारपुरे या तरुणांनी एकत्रित येऊन यासाठी पुढाकार घेतला. यापूर्वी केवळ आजार, व्याधी, तंदुरुस्तीसाठी पिंपरी-चिंचवड योग विद्या धाम, सामाजिक व आयुर्वेदिक संस्था आणि विविध धार्मिक संस्थांतर्फे योगाचे वर्ग घेतले जात होते. संस्थेच्या पहिल्या जिल्हा स्पर्धेस केवळ ७० ते ७५ स्पर्धक सहभागी झाले होते. आता ही संख्या ३००च्या वर पोहचली आहे. ५ वर्षांच्या बालकांपासून ८० वर्षांची ज्येष्ठ मंडळी स्पर्धेत उत्साहात सहभागी होतात. ज्येष्ठांच्या गटात तर सर्वाधिक प्रतिसाद असतो. गृहिणी असलेल्या महिलाही नियमित सराव करीत असून, त्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे. जवळच्या केंद्रावर जाऊन सराव करणाऱ्या अनेक महिला आहेत. तसेच, अनेक खासगी व महापालिका शाळा, तसेच महाविद्यालयात योगाचे धडे दिले जात आहेत. त्यातही नियमित सराव करणाऱ्या योगसाधकांची संख्या मोठी आहे. विद्यार्थ्यांसोबत पालकवर्गही योगाकडे आकृष्ट होत आहे. स्पर्धात्मक योगाच्या सरावामुळे शारीरिक तंदुरुस्तीचे सर्वच फायदे मिळताच, सोबत स्पर्धेत सहभागी होणे आणि जिंकण्याचा आनंदही मिळतो. सार्वजनिक ठिकाणी योगा प्रात्यक्षिक करण्याचे व्यक्तिगत धाडसही वाढते. संघांमुळे सांघिक भावना वाढीस लागते. शहराबरोबरच जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी आपापल्या गटात जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आशियाई, आंतरराष्ट्रीय, जागतिक अशा स्पर्धेत सहभागी होत यशस्वी कामगिरी केली जात आहे. पदके जिंकण्याची ही ओढ दिवसेंदिवस वाढतच आहे.