शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

यंदा पिफ ‘ऑफलाइन’च ? रसिकांमध्ये उत्सुकता 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2020 12:24 PM

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (पिफ)  तयारी सुरू आहे. महोत्सवासाठी एंट्री देखील येत आहेत.

पुणे : डिसेंबर-जानेवारी महिना हा विविध महोत्सवांचा काळ असतो. सांगीतिक आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांच्या पर्वणींमुळे शहरातील वातावरण कलात्मक होऊन जाते.  परंतु यंदा महोत्सवांवर कोरोनाचे सावट असल्याने चित्रपट महोत्सव ’ऑनलाइन’ की ’ऑफलाइन’ होणार? याविषयी रसिकांमध्ये उत्सुकता आहे. मात्र ओटीटी प्लँटफॉर्मवर चित्रपट आणि वेबसिरीज चा आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकांची ‘ऑनलाइन’ चित्रपट महोत्सव अनुभवण्याची मानसिकता नाही. यातच ऑनलाइन चित्रपट महोत्सवांसाठी पायरसीचा मुददा उपस्थित होऊ शकतो. अशा महोत्सवांना प्रायोजकत्व देखील मिळणे मुश्किल होते अशा विविध निरीक्षणातून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करणाऱ्या संस्थांनी महोत्सवासाठी ‘ऑफलाइन’लाच झुकते माप दिले आहे. देशविदेशातील चित्रपट प्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेले कान्स,व्हेनिससारखे जागतिक महोत्सव यंदा कोरोनामुळे ऑनलाइन पद्धतीने पार पडले. ’इफ्फी’ हा प्रत्यक्ष आणि दोन्ही स्वरूपात पार पडणार असला तरी निर्मात्यांनी ऑनलाइनसाठी चित्रपटांच्या पायरसीचा मुद्दा उपस्थित केला आहे. 

पुण्यात जानेवारी मध्ये पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ),किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवसारख्या महोत्सवांची मेजवानी रसिकांना मिळते.  पार्श्वभूमीवर ऑनलाइन चित्रपट महोत्सव आयोजित करताना येणाऱ्या अडचणी संदर्भात आयोजकांशी ’लोकमत’ने संवाद साधला.

’किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे प्रमुख वीरेंद्र चित्राव म्हणाले,  कोणत्याही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगभरातील चित्रपट निर्माते चित्रपट का पाठवतात तर त्यांच्या चित्रपटांवर चर्चा व्हावी. जेव्हा तो चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या नंतर प्रदर्शित केला जातो तेव्हा त्याला एक सपोर्ट मिळतो. हा उददेश ऑनलाइन चित्रपट महोत्सवांमध्ये साध्य होत नाही. यातच एखादा चित्रपट ऑनलाइन दाखविला तर तो कसाही पायरेटेड होऊ शकतो. जेव्हा एखादा ऑफलाइन महोत्सव आयोजित केला जातो तेव्हा तो पुणे, मुंबई अशा एका ठिकाणी आयोजित केला जातो. परंतु महोत्सव ऑनलाइन होतो तेव्हा तो  ‘ग्लोबल’ होतो. त्यामध्ये कायदेशीर मुद्दा उपस्थित होऊ शकतो. याशिवाय ऑनलाइन महोत्सवाला प्रायोजक मिळण्याच्या शक्यता देखील खूप कमी असतात. महोत्सवात किती नवीन चित्रपट प्रदर्शित होतात हे देखील महोत्सवाचे आकर्षण असते. यानिमित्ताने चित्रपटाचे दिग्दर्शक, कलाकार यांना भेटण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळते.  त्यामुळे आमच्यासमोर ऑनलाइन चित्रपट महोत्सव घेण्यासंदर्भात अनेक अडचणी आहेत. तो ऑफलाइन घ्यायचा की ऑनलाइन घ्यायचा याबाबतचा निर्णय आम्ही लवकरच घेऊ.----------------------------------------------------------------------------------------------------------पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (पिफ)  तयारी सुरू आहे. महोत्सवासाठी एंट्री देखील येत आहेत. मात्र महोत्सव कशा स्वरूपात घ्यायचा नि कधी घ्यायचा? याबाबत अजूनही ठोस निर्णय झालेला नाही. येत्या 10 दिवसांमध्ये चित्र नक्की स्पष्ट होईल. - डॉ. जब्बार पटेल, अध्यक्ष पुणेआंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव---------------------------------------------------------------------------------------------------------इफ्फी आणि पिफच्या तारखा एकाच वेळी, पिफ पुढे ढकलला जाण्याची शक्यता?गोव्यात येत्या 16 ते 24 जानेवारी दरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) आयोजित करण्यात आला आहे. याच दरम्यान पुण्यातही दि. 14 ते 21 जानेवारी दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) पार पडणार आहे. हे दोन्ही महोत्सव एकाच वेळी येत असल्याने पिफच्या तारखा पुढे ढकलण्यासंबंधीचा विचार सुरू झाला आहे. कदाचित पिफ मार्च पहिल्या किंवा शेवटच्या आठवड्यात घेतला जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे.-------------------------------------------------------------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेPIFFपीफcinemaसिनेमाJabbar Patelजब्बार पटेल corona virusकोरोना वायरस बातम्या