शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे निमगाव, खरपुडी येथील यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क दावडी: कोरोना रोगाच्या वाढत्या संसर्गामुळे निमगाव व खरपुडी येथील खंडोबा मंदिर माघी यात्रेनिमित्त बंद राहणार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

दावडी: कोरोना रोगाच्या वाढत्या संसर्गामुळे निमगाव व खरपुडी येथील खंडोबा मंदिर माघी यात्रेनिमित्त बंद राहणार आहे. तसेच शनिवारी (दि. २७) होणारी माघ पौर्णिमा यात्रा रद्द करण्यात आली आहे. भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

निमगाव खंडोबा हे राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत आहे. दरवर्षी माघ पौर्णिमा व चैत्र पौर्णिमेला खंडोबा देवाची मोठी यात्रा भरते. लाखो भाविक खंडोबा देवाच्या दर्शनासाठी येत असतात. तळीभंडार, कुलधर्म, जागरण, गोंधळ घालण्यासाठी मंदिर परिसरात मोठी गर्दी होते. यंदा मात्र कोरोना रोगाचा फैलाव होऊ नये. तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी देवस्थान ट्रस्टी, पुजारी, ग्रामस्थांनी बैठक घेऊन मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

निमगाव खंडोबा मंदिर दि. २६ ते २८ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहे. शनिवार दि. २७ होणारी माघ पौर्णिमा यात्रा रद्द करण्यात आली आहे. मंदिर ३ दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान खंडोबा मंदिराकडे येणारे सर्व रस्ते ३ दिवस बंद करण्यात येणार आहे. देवाचे मानापानाचे धार्मिक कार्यक्रम,पालखी मिरवणूक सोहळा मोजक्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्यामुळे भाविकांनी खंडोबा देवाच्या दर्शनासाठी येऊ नये, असे अावाहन जय मल्हार यात्रा व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष बबनराव शिंदे, उपाध्यक्ष संतोष शिंदे, सचिव बाबासाहेब शिंदे,पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे व ग्रामस्थांनी केले आहे.

चौकट

प्रतिजेजुरी म्हणून ओळख असलेले खरपुडी खुर्द (ता. खेड) येथील खंडोबा मंदिर कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. भाविकांनी माघ पौर्णिमा यात्रानिमित्त देवाच्या दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन खंडोबा देवस्थान ट्रस्टी अध्यक्ष सोपान गाडे, हिरामण मलघे, पुजारी राजेश गाडे यांनी केले आहे.