शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जखमींना मिळणार उपचारांचा खर्च

By admin | Updated: August 6, 2015 03:40 IST

शिरूर-चौफुला रस्त्यावर आंबळे शीवेजवळ एसटी बस झाडावर आदळून झालेल्या अपघातातील जखमींना उपचारांचा सर्व खर्च मिळणार असल्याचे आश्वासन एस टीचे

शिरूर : शिरूर-चौफुला रस्त्यावर आंबळे शीवेजवळ एसटी बस झाडावर आदळून झालेल्या अपघातातील जखमींना उपचारांचा सर्व खर्च मिळणार असल्याचे आश्वासन एस टीचे विभागीय नियंत्रक शैलेश चव्हाण यांनी दिले आहे़ शिरूर-चौफुला ही एसटी बस चौफुलाकडून शिरूरकडे येत असताना आंबळे शीवेजवळ झाडाला धडकून बसचा अपघात झाला होता. यात वाहक, चालकासह १६ जण जखमी झाले होते. या जखमींना येथील मातोश्री मदनबाई धारीवाल व विघ्नहर्ता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमदार बाबुराव पाचर्णे यांनी धारीवाल रुग्णालयात जखमींची भेट घेतली असता जखमींच्या नातेवाईकांनी एसटी महामंडळाविषयी त्यांच्याकडे तक्रार केली होती. जखमींना प्रत्येकी एक हजार रुपये दिले. मात्र पुढील खर्चाविषयी काहीच स्पष्ट करण्यात आले नसल्याचे पाचर्णे यांना सांगण्यात आले. यावर पाचर्णे यांनी एसटीचे विभागीय नियंत्रक शैलेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला व जखमींना उपचाराचा सर्व खर्च दिला जावा, अशा सूचना केल्या.त्यानंतर चव्हाण यांनी जखमींची भेट घेऊन जखमींना मदतीबाबत आश्वस्त केले. शिरूर आगाराचे व्यवस्थापक एम. आर. नगराळे यांनी सांगितले, की आमदार पाचर्णे यांच्या सूचनेनुसार जखमींना मदतीसाठी असणारे ‘पी’ फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. जखमींचा जो काही खर्च होईल तो त्यांनी प्रथम रुग्णालात जमा करायचा आहे. त्यानंतर ‘पी’ फॉर्म भरून विभागीय नियंत्रण विभागाकडे जमा करायचा आहे. तेथे नियुक्त समिती हा खर्च मंजूर करते. यामुळे जखमींना संपूर्ण खर्चाची रक्कम मिळणार आहे. एसटी अपघाताबाबत पावसाळी अधिवेशनात नवीन विधेयक मंजूर करण्यात आले आहे. यानुसार अपघातात मृत पावल्यास मृताच्या नातेवाईकांना आता ५ लाख रुपये मिळणार आहेत. जखमींचा संपूर्ण खर्च महामंडळाला करावा लागणार असल्याचे आमदार पाचर्णे यांनी सांगितले.