शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
2
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
3
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
4
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
5
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
6
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
7
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
8
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
9
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
10
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
11
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
12
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
13
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
14
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
15
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
16
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
17
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
18
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
19
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
20
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक कुस्तीसाठी पौडची तनुजा

By admin | Updated: September 1, 2015 03:50 IST

लवळे (ता. मुळशी) येथील तनुजा आल्हाट या विद्यार्थिनीची पाचव्या जागतिक सिरम चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. म्यानमार येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतातून

पौड : लवळे (ता. मुळशी) येथील तनुजा आल्हाट या विद्यार्थिनीची पाचव्या जागतिक सिरम चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. म्यानमार येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतातून ९ खेळाडूंची निवड झाली आहे. त्यात महाराष्ट्रातील तीन जणांचा समावेश आहे. तनुजा पुणे जिल्ह्यातील एकमेव खेळाडू आहे. सामान्य कुटुंबातील तनुजाचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण लवळे-राऊतवाडीला झाले. तनुजा चौथीत असताना नामांकित मल्ल व प्रशिक्षक दिनेश गुंड यांची मुलगी कुस्तीसाठी लवळेच्या यात्रेत आली होती. तिचे कुस्तीतील कसब पाहून भारावलेल्या तनुजाने कुस्तीच्या आखाड्यात उतरण्याचा हट्ट वडिलांकडे धरला. वडिलांनीही प्रपंचाची काटकसर करीत तनुजाला कुस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली. शिक्षणाबरोबर खास कुस्तीचेही धडे मिळावेत यासाठी तिच्या वडिलांनी तिला आळंदी येथील ज्ञानेश्वर विद्यालयात दाखल केले. त्याच ठिकाणी ती जोग महाराजांच्या व्यायामशाळेत राहू लागली. शिक्षणाची पाटी गिरवता गिरवता तनुजा आळंदीत कुस्तीच्या आखाड्यातही कर्तबगारी गाजवू लागली. प्रशिक्षक दिनेश गुंड यांनी कुस्तीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण तनुजाला दिले. त्यांनी दररोज तिच्याकडून कसून सराव करून घेऊन कुस्तीचे चितपटाचे अनेक डाव शिकविले. त्याचा सराव करून तनुजाही पारंगत झाली. राज्यातून तीन तर देशातून नऊ खेळाडू या स्पर्धेसाठी म्यानमारला जाणार आहेत. (वार्ताहर)