जागतिक बँकेच्या प्रतिनिधींकडून आराखडा बनविण्याचे काम सुरू

By Admin | Updated: August 22, 2015 02:20 IST2015-08-22T02:20:08+5:302015-08-22T02:20:08+5:30

केंद्र शासनाच्या अटल मिशन फॉर रिज्युवेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) योजनेसाठीचा महापालिकेचा प्रकल्प आराखडा जागतिक बँक तयार करणार असून

WORLD BANK REPRESENTATIVE | जागतिक बँकेच्या प्रतिनिधींकडून आराखडा बनविण्याचे काम सुरू

जागतिक बँकेच्या प्रतिनिधींकडून आराखडा बनविण्याचे काम सुरू

पुणे : केंद्र शासनाच्या अटल मिशन फॉर रिज्युवेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) योजनेसाठीचा महापालिकेचा प्रकल्प आराखडा जागतिक बँक तयार करणार असून, त्यासाठी बँकेचे प्रतिनिधी गुरुवारी पुण्यात दाखल झालेले आहेत. या अधिकाऱ्यांंसमोर महापालिकेच्या प्रस्तावित प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले असून, त्या आधारावर बँकेकडून शहरासाठीचा आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी शुक्रवारी दिली. तसेच, या आराखड्यासाठी प्रत्येक विभागाच्या स्वतंत्र बैठका घेण्यात येणार असल्याचेही कुमार यांनी स्पष्ट केले.
मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपा सरकारने, आघाडी
सरकारने शहरांच्या विकासासाठी
सुरू केलेली जवाहरलाल नेहरू
नागरी पुनरुत्थान योजना (जेएनएनयूआरएम) बंद केली. याच वेळी या योजनेच्या धर्तीवर केंद्र शासनाने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा नावाने ‘अमृत मिशन’ योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील तब्बल ५०० शहरांना पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी निधी पुरविला जाणार असून, त्यासाठी केंद्रीय अंदाजपत्रकात तब्बल ४८ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातील ४३ शहरांची निवड झाली असून पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहराचा स्वतंत्र समावेश करण्यात आला आहे. याबाबतचे परिपत्रकही राज्य शासनाने नुकतेच जारी केले आहे. त्यानुसार, राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली नसली, तरी निवड झालेल्या शहरांंनी या योजनेतील सहभागासाठी शहराचा सेवास्त सुधारणा आराखडा अर्थात ‘स्लीप’ (सर्व्हिस लेवल इम्प्रूव्हमेंट प्लँन) तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
त्यानुसार, महापालिकेचा स्लीप आराखडा तयार करण्यासाठी बँकेचे चार प्रतिनिधी पुणे दौऱ्यावर आले आहेत. त्याअंतर्गत पालिकेकडून समान पाणीवाटप योजनेच्या
सुमारे २,८०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाबाबत जागतिक बँकेशी चर्चा करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: WORLD BANK REPRESENTATIVE