दावडी येथे शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:11 IST2021-09-26T04:11:17+5:302021-09-26T04:11:17+5:30

जागतिक आनंदाची शाळाचे संस्थापक विनय सातपुते यांनी संस्थेची उद्दिष्टे सांगितली, तसेच संघटन हे सूत्र बनवावे व सर्वांनी एकत्र येऊन ...

Workshop for farmers at Dawadi | दावडी येथे शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा

दावडी येथे शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा

जागतिक आनंदाची शाळाचे संस्थापक विनय सातपुते यांनी संस्थेची उद्दिष्टे सांगितली, तसेच संघटन हे सूत्र बनवावे व सर्वांनी एकत्र येऊन लवकरच एक शेतकरी उत्पादक कंपनी सुरू करण्याची संकल्पना मांडली. किमान एक हजार कोटींचा फक्त भाजीपाला पिंपरी-चिंचवडला दरवर्षी लागतो. हाच माल जर स्वत: शेतकऱ्यांनी स्वत:च्या कंपनीमार्फत विकला तरच शेतकऱ्याला सातत्याने पैसै मिळतील, असेही सातपुते यांनी सांगितले.

महाराष्ट्र उद्योजक विकास केंद्राचे विभागीय अधिकारी सुरेश उमाप यांनी यशस्वी उद्योजक कसे होता येईल याबद्दल मार्गदर्शन केले, तसेच उद्योग कसा निवडावा व काही सरकारी योजनांची माहिती दिली. दावडीचे सरपंच संभाजी घारे, पोलीस पाटील आत्माराम डुंबरे, सदस्य संतोष सातपुते, अनिल नेटके, हिरामण खेसे यांनी गावातील युवकांसाठी लवकरच एक अद्ययावत कॉम्प्युटर लॅब उभारणार असल्याचे सांगितले.

250921\1532-img-20210925-wa0036.jpg

????? ?? ??? ???? ???? ????????????? ????????? ??????? ???.

Web Title: Workshop for farmers at Dawadi