Pune Metro: पुण्यात मेट्रो कारशेडचे काम सुरु असताना ५० फूट उंचीवरून पडून कामगाराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 10:18 IST2022-05-16T10:18:32+5:302022-05-16T10:18:49+5:30

पौड रस्त्यावरील वनाज कंपनीजवळ मेट्रो कारशेडचे काम सुरु होते

Worker dies after falling from 50 feet height while working on Metro car shed in Pune | Pune Metro: पुण्यात मेट्रो कारशेडचे काम सुरु असताना ५० फूट उंचीवरून पडून कामगाराचा मृत्यू

Pune Metro: पुण्यात मेट्रो कारशेडचे काम सुरु असताना ५० फूट उंचीवरून पडून कामगाराचा मृत्यू

पुणे : पुण्यात मेट्रो कारशेडचे काम सुरु असताना ५० फूट उंचीवरून पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी रात्री उशिरा पौड रस्त्यावरील वनाज कंपनीजवळ घडली. मूलचंद्रकुमार सीताराम (रा उत्तर प्रदेश) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे.

कोथरूड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  पौड रस्त्यावरील वनाज कंपनीजवळ मेट्रो कारशेडचे काम सुरु होते. त्याठिकाणी इतर कामगारांबरोबर मूलचंद्रकुमार सीताराम कार्यरत होते. त्यावेळी ५० फूट वरुन खाली पडल्याने ते जखमी झाले. त्यांनी सुरक्षाविषयक साहित्यही घातले होते. रात्री तातडीने त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.  

Web Title: Worker dies after falling from 50 feet height while working on Metro car shed in Pune