शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
3
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
4
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
5
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
6
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
7
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
8
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
9
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
10
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
11
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
12
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
13
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
14
"निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली..."; काँग्रेसचा टोला
15
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
16
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
17
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
18
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
19
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
20
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर काम करा : राज ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 08:00 IST

लोकसभा निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर सभा घेऊन भाजपाला मतदान न करण्याचे आवाहन करुनही मनसेचा प्रभाव मतदारांवर पडल्याचे दिसले नाही...

ठळक मुद्देमतदार संघनिहाय चर्चा राज ठाकरे यांनी शाखाध्यक्ष व उपाध्यक्षांकडून जाणून घेतल्या पक्षवाढीसाठीच्या कल्पना  

पुणे : लोकसभा निवडणुकांमध्ये  ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत भाजपाविरोधात रान उठवलेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आगामी विधानसभेच्या तयारीसाठी पुण्यामध्ये कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. दोन दिवस पुण्यामधील अशोक नगरमध्ये नुकत्याच मतदार संघनिहाय घेतलेल्या बैठकांमध्ये शाखाध्यक्ष व उपाध्यक्षांकडून पक्षवाढीसाठीच्या कल्पना जाणून घेत संघटना मजबूत करण्यासाठी काय करता येईल या संदर्भात चर्चा केली. साहेबांनी आमचे म्हणणे  ‘शांततेत’ ऐकून घेतल्याचेही अनेक कार्यकर्त्यांनी सांगितले. लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर काम करण्याच्या सूचनाही यावेळी ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केल्या. 
लोकसभा निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर सभा घेऊन भाजपाला मतदान न करण्याचे आवाहन करुनही मनसेचा प्रभाव मतदारांवर पडल्याचे दिसले नाही. आता विधानसभा निवडणुकांच्या तयारीला मनसेने सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शेवटच्या फळीतील कार्यकर्त्यांचे नमके काय म्हणणे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. दोन दिवस पुण्यात ठाण मांडून बसलेल्या ठाकरेंनी घेतलेल्या बैठकीला पक्षाच्या मुख्य नेत्यांसह शहर पदाधिकारी उपस्थित होते. प्रत्येक मतदार संघाला जवळपास दीड ते दोन तासाचा वेळ देण्यात आला होता. मतदार संघांमधील शाखाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष 15-15 जणांच्या गटाने त्यांची भेट घेत होते. 
पक्षाचा गाभा कार्यकर्ता हाच असून त्याच्या पायावरच पक्ष उभा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अधिक सक्रिय व्हावे, नागरिकांच्या पक्षाकडून असलेल्या अपेक्षा जाणून घ्याव्यात, त्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आवाज उठवावा अशा प्रकारच्या सूचना राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केल्या. यासोबतच पक्षांतर्गत नेमके काय सुरु आहे याचीही चाचपणी केली. पक्षाच्या अजेंड्यावर नेमके काय प्रश्न असावेत?, कार्यकर्त्यांना काम करताना नेमक्या काय अडचणी येतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीही त्यांनी शांतपणे ऐकून घेतल्या. शाखाध्यक्षांनी ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न, महिला सुरक्षा, विद्यार्थी करिअर मार्गदर्शन आदी छोट्या छोट्या कार्यक्रमांमधून पक्षाला बळकटी मिळू शकेल अशाही कल्पना मांडल्या. शहरातील कोथरुड, शिवाजीनगर, पर्वती, कसबा, वडगाव शेरी, हडपसर मतदार संघांच्या पदाधिकारी आणि शहर पदाधिकाऱ्यांच्या वेगळ्या बैठका घेण्यात आल्या. 
====
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या शहर पदाधिकाऱ्यांच्या राज ठाकरे आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांसोबत आतापर्यंत तीन ते चार सविस्तर बैठका झाल्या आहेत. पक्षाचा अजेंडा आणि विधानसभेची रणनिती याविषयी या बैठकांमध्ये चर्चा झाल्याचे पदाधिकाºयांनी सांगितले. मात्र, नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये विधानसभेसंदर्भात चर्चा झाली नसल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभा