शहरं
Join us  
Trending Stories
1
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
2
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
3
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
4
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
5
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
6
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
7
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
8
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
9
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
10
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
11
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
12
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
13
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
14
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
15
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
16
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
17
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
18
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
19
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 16:58 IST

पोलिसांना अडकवण्यासाठी महिला पत्रकाराने मोठा कट रचला होता.

Mirzapur Crime: उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातून एक खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिला यूट्यूबरने पोलिसांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी आणि त्यांच्यावर दबाव आण्यासाठी स्वतःच्याच अपहरणाचा आणि हत्येच्या प्रयत्नाचा बनाव रचला. मात्र, पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या मास्टरमाईंड महिलेचा पर्दाफाश केला. याप्रकरणी मुख्य आरोपी सरिता सिंह पटेल हिच्यासह ६ जणांना अटक करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

चुनार येथील रहिवासी आणि स्वतःला पत्रकार म्हणवून घेणारी यूट्यूबर सरिता सिंह पटेल ४ मे रोजी बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ६ मे रोजी राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सरिता अत्यंत गंभीर अवस्थेत सापडली होती. तिचे हात-पाय रशीने बांधलेले होते, तोंड कापडाने बांधले होते आणि शरीरावर पेट्रोल ओतलेले होते. ही दृश्ये पाहून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती.

पोलिसांचा संशय आणि बनाव उघड

सुरुवातीला हे अपहरणाचे प्रकरण वाटत होते. मात्र, पोलीस अधिकाऱ्यांना हे प्रकरण वेगळेच वाटत होते. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, सरिता सिंह एका ओळखीच्या व्यक्तीच्या दुचाकीवर बसून आरामात जाताना दिसली. इतकेच नाही तर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर ती फिरतानाही कॅमेऱ्यात कैद झाली. यामुळे पोलिसांचा संशय बळावला.

चौकशीत धक्कादायक खुलासा

पोलिसांनी जेव्हा सरिताची कसून चौकशी केली, तेव्हा तिने आपला गुन्हा कबूल केला. सरिताने पोलिसांना सांगितले की, चुनार पोलिसांनी काही लोकांवर कारवाई करून त्यांना तुरुंगात पाठवले होते, ज्याचा तिला राग होता. पोलिसांवर दबाव आणण्यासाठी आणि बेकायदेशीरपणे पैसे उकळण्यासाठी तिने हा कट रचला. ओळखीच्या अमरदीप याच्या मदतीने तिने स्वतःला चार दिवस लपवून ठेवले. तिने आपली ओळख लपवण्यासाठी साडी नेसली आणि राजगड भागात जाऊन स्वतःचे हात-पाय बांधून अपहरण झाल्याचे नाटक केले. प्रकरण अधिक गंभीर वाटावे म्हणून अमरदीपने तिच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि तो तिथून निघून गेला.

६ जणांना बेड्या

या कटात सरिताला साथ देणाऱ्या खालील ६ जणांना पोलिसांनी अटक करून तुरुंगात धाडले आहे. यामध्ये सरिता सिंह पटेल, सुभाष सिंह पटेल, अमरदीप, विजय कुमार सिंह, अंकिता, सुनीता यांचा समावेश आहे. पोलिसांनी अमरदीपच्या मदतीने सरिताने ओळख लपवण्यासाठी वापरलेल्या वस्तूदेखील जप्त केल्या आहेत.

"सरिता सिंह पटेल ही पोलिसांना खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी सातत्याने दबाव आणत होती. जेव्हा तिचे प्रयत्न अयशस्वी झाले, तेव्हा तिने स्वतःच्या अपहरणाचा हा बनाव रचला. पोलिसांनी सर्व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे हा कट उधळून लावला आहे," असे पोलिसांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : YouTuber faked abduction to frame police, six arrested in India.

Web Summary : A female YouTuber in Uttar Pradesh orchestrated her own kidnapping, even staging an attempted murder, to falsely implicate police officers. However, authorities uncovered her plot using CCTV footage and arrested her and six accomplices. She aimed to pressure police and extort money.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस