शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वाळूमाफियाचा सिनेस्टाइल पाठलाग

By admin | Updated: April 14, 2015 23:33 IST

जेसीबी महसूल पथकाला चकवा देऊन पळवून नेत असताना नायब तहसीलदार गीतांजली मुळीक (गरड) यांनी फिल्मस्टाइल पाठलाग करून पकडला. नागरिकांसमोर हा थरार घडला.

शिरूर : मांडवगण फराटा येथे अवैध वाळूउपसा करताना ताब्यात घेण्यात आलेला जेसीबी महसूल पथकाला चकवा देऊन पळवून नेत असताना नायब तहसीलदार गीतांजली मुळीक (गरड) यांनी फिल्मस्टाइल पाठलाग करून पकडला. नागरिकांसमोर हा थरार घडला.मांडवगण फराटा येथे नदीपात्राच्या प्रदूषणाबाबत मांडवगण येथील भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेने महसूल विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने नायब तहसीलदार गरड या मंडलाधिकारी, तलाठी यांच्या पथकासह मांडवगण येथे गेल्या होत्या.मांडवगण-कानगाव पुलावरून पाहणी करताना पुलाच्या पलीकडील बाजूस ट्रक व जेसीबी अवैध वाळूउपसा करीत असल्याचे निदर्शनास आल्यावर पथकाने तिथे धाव घेतली. या वेळी पथकाला पाहून ट्रकचालक पळून गेला. जेसीबी चिखलात फसल्याने तो ताब्यात घेतला. जेसीबी चिखलातून बाहेर काढण्याचा जेसीबीचालक प्रयत्न करीत होता. बाहेर निघताक्षणी त्याने जेसीबी वेगाने कानगावच्या दिशेने पळवला. हे पाहताच गीतांजली मुळीक या जेसीबीच्या मागे पळाल्या. मागून आलेल्या कर्मचाऱ्याच्या दुचाकीवर बसून त्यांनी जेसीबीचा एक किलोमीटर पाठलाग केला व अखेर जेसीबी ताब्यात घेतला.महिला अधिकाऱ्याने दाखवलेल्या धाडसाबद्दल नागरिकांनी त्यांचे कौतुक केले. (वार्ताहर)४नायब तहसीलदार गीतांजली मुळीक (गरड) यांना मागील वर्षी ‘लोकमत’तर्फे ‘ब्रेव्हरी अ‍ॅवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले आहे.