शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

अबलांच्या मदतीसाठी महिला बीट मार्शल

By admin | Updated: July 1, 2015 03:46 IST

महिला, मुली यांची टिंगल, त्यांच्यावर होणारे अत्याचार यांना परिणामकारक आळा घालण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यातील दोन सशस्त्र महिला कर्मचाऱ्यांची महिला बीट मार्शल

पुणे : महिला, मुली यांची टिंगल, त्यांच्यावर होणारे अत्याचार यांना परिणामकारक आळा घालण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यातील दोन सशस्त्र महिला कर्मचाऱ्यांची महिला बीट मार्शल म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. एखाद्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर १० मिनिटांत घटनास्थळी पोहोचून महिलांना मदत करण्याचा प्रयत्न या महिला पोलीस करणार आहेत.आज या महिला बीट मार्शलना १८ दुचाक्यांचे वाटप पोलीस आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले. शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमासाठी सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रकाश मुत्त्याल, सी. एच. वाकडे, मुख्यालयाचे उपायुक्त अरविंद चावरिया आदी उपस्थित होते.मुख्यालयाचे उपायुक्त अरविंद चावरिया म्हणाले, ‘‘दोन दिवस या महिला बीट मार्शलना शस्त्रविषयक प्रशिक्षण दिले जाणार आहे. दोन दिवसांनी त्या प्रत्यक्ष गस्त घालू लागतील. त्यांना रिव्हॉल्व्हरसारखे हाताळण्यास सोपे शस्त्र दिले जाईल. कमीत कमी वेळेत घटनास्थळी पोहोचण्याच्या दृष्टीने काय करता येईल, अशी कार्यपद्धती आखण्यात आली असून महिलांनी, मुलींनी शंभर नंबरवर संपर्क साधताच महिला बीट मार्शल त्या ठिकाणी रवाना होतील. (प्रतिनिधी)