पतीच्या छळाला कंटाळून महिलेने केली गळफास घेऊन आत्महत्या; कोथरुडमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 21:37 IST2021-05-08T21:37:33+5:302021-05-08T21:37:52+5:30

स्नेेेहलचा पती सागर हा तिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेऊन तिला शिवीगाळ करुन मारहाण करीत असे.

The women commited sucide due to husband harrasment; Incidents in Kothrud | पतीच्या छळाला कंटाळून महिलेने केली गळफास घेऊन आत्महत्या; कोथरुडमधील घटना

पतीच्या छळाला कंटाळून महिलेने केली गळफास घेऊन आत्महत्या; कोथरुडमधील घटना

पुणे : पतीकडून होणार्‍या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका विवाहितेने राहत्या घरी पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

स्नेेेहल सागर मांडेकर (वय २६) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. कोथरुड पोलिसांनी तिचा पती सागर बाळु मांडेकर (वय २९, रा. सुतारदरा, कोथरुड) याला अटक केली आहे. 

याप्रकरणी स्नेहल हिच्या आईने फिर्याद दिली आहे. ही घटना सुतारदरा येथील शिवसाईनगरमध्ये गुरुवारी रात्री घडली. 

स्नेेेहलचा पती सागर हा तिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेऊन तिला शिवीगाळ करुन मारहाण करीत असे. या छळाला कंटाळून गुरुवारी रात्री तिने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करुन पतीला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक आर. सी. कोळी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: The women commited sucide due to husband harrasment; Incidents in Kothrud