शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

पुणे जिल्ह्यात कुटुंब नियोजनाची जबाबदारी महिलांकडेच; नसबंदीला पुरूषांची टाळाटाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 3:42 PM

मागील पाच वर्षांमध्ये १ लाख महिलांच्या तुलनेत केवळ ८६४ पुरूषाच्या नसबंदी शस्त्रक्रिया

रविकिरण सासवडे- बारामती: स्त्री-पुरूष समानतेचा जागर आज सर्वत्र होत असला तरी ग्रामीण व शहरी भागातील कुटुंब नियोजनाची जबाबदारी महिलांवर टाकली जात आहे. पुरुषी अहंकार व वेगवेगळ्या गैरसमजापोटी पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेस टाळाटाळ केली जात असल्याचे चित्र आहे. पुणे जिल्ह्यात पाच वर्षात लाखभर महिलांच्या तुलनेत  केवळ ८६४ पुरुषांनी  नसबंदी शस्त्रक्रिया करून घेतल्या आहेत.

नुकताच जागतिक पुरूष नसबंदी सप्ताह पार पडला.शहरी व ग्रामीण भागात पुरूष नसबंदी शस्त्रक्रियेबाबतची अनस्था असल्यामुळे याबाबत व्यापक प्रमाणावर जनजागृती होणे गरजेचे आहे. लहान कुटूंब, सुखी कुटूंब ही संकल्पना मागील काही वर्षांमध्ये सर्वदूर पोहचली.यातुनतच कुटूंब नियोजन शस्त्रक्रियेने गती पकडली. वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या कुटुंब नियोजन उपक्रमात पुरुषांचा सहभाग वाढावा यासाठी अनुदानाची विशेष तरतूद केली आहे. मागील पाच वर्षांमध्ये पुणे जिल्ह्यात आरोग्य केंद्र अंतर्गत  १ लाख २ हजार ६९८ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यामध्ये केवळ ८६४  पुरुषांनी नसबंदी केली आहे. तर यामध्ये १ लाख एक हजार ८३४ महिलांचा समावेश आहे.

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या अनुसुचित जाती जमाती व दारिद्य्र रेषेखालील महिलांना ६०० रुपये तर सर्वसाधारण महिलांना २५० रुपये अनुदान दिले जाते. यामध्ये पुरुषांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढवा यासाठी पुरूषांना १४०० रुपये अनुदान सरकारकडून दिले जात आहे. या अत्यंत सोप्या व गुंतागुत विरहीत शस्त्रक्रियेबाबत जनजागृती करण्यासाठी स्थानिक स्थरावर वैद्यकिय अधिकारी, आशा, अंगणवाडी सेविका प्रयत्न करत आहेत.

पुणे जिल्ह्यात पाच वषार्तील नसबंदी दृष्टिक्षेपात     वर्षे         पुरुष     महिला      एकूण २०१५-१६     १६५    २३७२१     २३८८६ २०१६-१७     ३३१    २२६११      २२९४२ २०१७-१८      ८४      १८७१२    १८७९६ २०१८-१९      १३३     १९१४९    १९२८२ २०१९-२०      १५१     १७६४१    १७७९२

........

आरोग्य विभागाच्या वतीने याबाबत सातत्याने जनजागृती

 स्रियांच्या कुटूंबनियोजन शस्त्रक्रियेच्या तुलनेत पुरूष नसबंदी शस्त्रक्रियेचे प्रमाण फारच कमी आहे. पुरूषांमध्ये असणारे याबाबतचे गैरसमज आणि समाजाची मानसिकता याला कारणीभूत आहे. नसबंदी शस्त्रक्रिया केली म्हणून पुरूषांच्या आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. आरोग्य विभागाच्या वतीने याबाबत सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे.- डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी,पुणे जिल्हा परिषद

............

पुरूषप्रधान संस्कृती कारणीभूत... 

भारतीय समाजात असलेली पुरूषप्रधान संस्कृती याला कारणीभूत आहे. तसेच दबावापोटी किंवा इतर कारणांनी घरातील महिलाच कुटूंब नियोजनाची जबाबदारी स्वत:वर घेते. पुरूषांच्या नसबंदी शस्त्रक्रियेमध्ये जास्त गुंतागुंत नसते. अगदी शस्त्रेक्रियेनंतर सबंधित पुरूष दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपली दैनंदिन कामे पूर्वीप्रमाणेच करू शकतात. मात्र याबाबत समाजाची असलेली मानसिकतेमुळे पुरूषांच्या नसबंदी शस्त्रक्रियेचे प्रमाण कमी आहे.- डॉ. सदानंद काळे, वैद्यकिय अधिक्षक, बारामती उपजिल्हा रूग्णालय------------------------

टॅग्स :PuneपुणेFamilyपरिवारWomenमहिलाhospitalहॉस्पिटल