महिलेचा गळा आवळून खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह झाडाला लटकवला, खेड तालुक्यातील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 15:17 IST2026-02-23T15:17:41+5:302026-02-23T15:17:51+5:30

दोघेही एकाच ठिकाणी काम करत असून कामावर जाताना सोळू गावच्या हद्दीतील जंगलात त्यांच्यामध्ये जोरदार वाद झाला होता

Woman strangled to death; Body hung from a tree to destroy evidence, shocking incident in Khed taluka | महिलेचा गळा आवळून खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह झाडाला लटकवला, खेड तालुक्यातील धक्कादायक प्रकार

महिलेचा गळा आवळून खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह झाडाला लटकवला, खेड तालुक्यातील धक्कादायक प्रकार

आळंदी: कामावर जात असताना एका ३२ वर्षीय तरुणाने एका महिलेचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना सोळू (ता. खेड) येथील जंगलात घडली. विशेष म्हणजे, या खुनानंतर आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह झाडाला लटकवून तो आत्महत्येचा प्रकार असल्याचा बनाव रचला. मात्र, आळंदीपोलिसांनी काही तासांतच या गुन्ह्याचा तपास करून आरोपीला अटक केली आहे.

मयत पार्वती दगडूजी दराडे (वय. ३०, रा. माऊली पार्क, राजगुरूनगर बँक परिसर, आळंदी) आणि आरोपी विष्णू महादेव पावडे (वय. ३२, मूळ रा. परभणी, सध्या रा. धानोरे, ता. खेड) हे एकमेकांचे परिचित होते. दोघेही एकाच ठिकाणी काम करत होते. शुक्रवारी (दि. २०) सायंकाळी चार वाजता ते दोघेही दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडले. सोळू गावच्या हद्दीतील जंगलात गेल्यावर त्यांच्या मध्ये कोणत्या तरी कारणाने जोरदार वाद झाला. या वादात विष्णूने पार्वतीचा गळा आवळून जागेवरच खून केला. खून केल्यानंतर पकडले जाऊ नये, या भीतीने विष्णूने हा प्रकार आत्महत्या म्हणून खपविण्याचा प्रयत्न केला. त्याने स्कार्फच्या सहाय्याने तिचा मृतदेह एका झाडाला जमिनीपासून चार फूट उंचीवर लटकवला आणि घटनास्थळावरून पसार झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रथमदर्शनी हा प्रकार संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित विष्णू पावडे याला ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक कुमार गिरीगोसावी यांनी फिर्याद दिली असून, आळंदी पोलिस ठाण्यात खुनाचा आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title : महिला का गला घोंटकर हत्या; शव पेड़ पर लटकाया: खेड़ में सनसनी

Web Summary : खेड़ में एक 32 वर्षीय व्यक्ति ने एक महिला का गला घोंट दिया और अपराध छिपाने के लिए आत्महत्या का नाटक किया। आलंदी पुलिस ने तेजी से जांच कर आरोपी को गिरफ्तार किया। पीड़िता और आरोपी एक दूसरे को जानते थे।

Web Title : Woman Strangled, Body Hung to Tree: Shocking Incident in Khed

Web Summary : A 32-year-old man strangled a woman in Khed, attempting to stage suicide to conceal the crime. Alandi police swiftly investigated and arrested the accused. The victim and accused knew each other.