वाघोलीत डंपरच्या चाकाखाली येऊन दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 13:41 IST2025-09-29T13:40:46+5:302025-09-29T13:41:11+5:30
दुचाकीला डंपरचा धक्का लागल्यावर दुचाकी एका बाजूला गेली व त्या डंपरच्या चाकाखाली आल्या.

वाघोलीत डंपरच्या चाकाखाली येऊन दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू
वाघोली : डंपरच्या चाकाखाली आल्याने दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वाघोलीतील वाघेश्वर मंदिर चौकात रविवारी (दि. २८) सकाळी आठ वाजता घडली. या प्रकरणी डंपर चालकावर वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती प्रकाश देठे (वय ४५, रा. विश्रांतवाडी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती या दुचाकीवर जात होत्या. वाघेश्वर मंदिर चौकात डंपर भावडी रस्त्याकडे वळत होता. त्यांच्या दुचाकीला डंपरचा धक्का लागला. त्यामुळे दुचाकी एका बाजूला गेली व त्या डंपरच्या चाकाखाली आल्या. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दुचाकीच्या क्रमांकावरून त्यांची माहिती काढून नातेवाइकांना कळविण्यात आले. या प्रकरणी चालक हिंमत जालिंदर कारके (वय ४२, रा. वाघोली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी दत्तातेय राजू गोरे यांनी फिर्याद दिली. मृत महिलेला छत्रपती श्री शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर नागरिकांनी प्रशासनाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. यामध्ये प्रकाश जमधडे, सीमा गुट्टे, हिरा वाघमारे, धर्मेंद्र सातव, सुनील साळवे, मितेश आदी सहभागी झाले होते.