प्रेमाच्या बहाण्याने महिलेचा पैशांसाठी त्रास; विवाहित तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, धायरीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 15:31 IST2025-09-15T15:30:53+5:302025-09-15T15:31:18+5:30

आरोपी महिलेने प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना धमकावून पैसे उकळण्यास सुरुवात केली होती

Woman harassed for money on the pretext of love; Married man took extreme step, incident in Dhaari | प्रेमाच्या बहाण्याने महिलेचा पैशांसाठी त्रास; विवाहित तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, धायरीतील घटना

प्रेमाच्या बहाण्याने महिलेचा पैशांसाठी त्रास; विवाहित तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, धायरीतील घटना

पुणे: प्रेमाचा बहाणा करून पैशांसाठी त्रास दिल्याने तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धायरी भागात घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून महिलेला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी महिलेच्या मुलीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश अंकुश रायकर (३५, रा. रायकर मळा, धायरी, सिंहगड रस्ता) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सपना राजाराम कदम (४० रा. धायरी ) हिला अटक करण्यात आली आहे. तिची मुलगी संजना काशीद हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गणेश रायकर यांच्या पत्नीने नांदेड सिटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश विवाहित आहेत. आरोपी सपना कदम धायरीतील रायकर मळा परिसरात राहायला आहे. आरोपी कदमने गणेश यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर त्यांना धमकावून पैसे उकळण्यास सुरुवात केली. सपना, तिची मुलगी संजना यांनी त्यांना वारंवार त्रास दिला. त्यांच्या त्रासामुळे शनिवारी (दि. १३) गणेश यांनी राहत्या घरात आत्महत्या केल्याचे गणेश यांच्या पत्नीने पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी सपना कदम, संजना काशीद यांच्यासह कोमल काशीद, सारिका मोझे, शिवानी मोझे आणि संतोश शेलार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपनाला अटक करण्यात आली असून, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत पुढील तपास करत आहेत.

Web Title: Woman harassed for money on the pretext of love; Married man took extreme step, incident in Dhaari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.