फ्लॅट, गोडाऊनच्या नावाखाली महिलेला ६० लाखांचा गंडा; राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकाच्या भावावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 09:56 IST2026-03-27T09:55:41+5:302026-03-27T09:56:46+5:30

२०१६ मध्ये झालेल्या व्यवहाराचे २०२६ पर्यंत तब्बल १० वर्षांचा कालावधी उलटूनही आरोपीने मालमत्तेचे खरेदीखत करून दिले नाही

Woman duped of Rs 60 lakhs in the name of flat, sweet shop; Case filed against NCP corporator's brother | फ्लॅट, गोडाऊनच्या नावाखाली महिलेला ६० लाखांचा गंडा; राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकाच्या भावावर गुन्हा

फ्लॅट, गोडाऊनच्या नावाखाली महिलेला ६० लाखांचा गंडा; राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकाच्या भावावर गुन्हा

पुणे : फ्लॅट आणि गोडाऊन देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची ६० लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नगरसेवक हाजी अब्दुल गफुर पठाण यांचे बंधू हुसेन अहमद पठाण यांच्यावर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश पेठ परिसरात हा प्रकार घडला.

याबाबत अश्विनी दिलीप सारंदा (वय ३१, रा. गणेश पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी हुसेन अहमद पठाण (वय ५०, रा. दत्तवाडी) याने ‘अम्मार डेव्हलपर्स अँड बिल्डर्स’ या कंपनीच्या माध्यमातून गणेश पेठेतील ‘अमान प्लाझा’ या इमारतीत मालमत्ता देण्याचे आमिष फिर्यादीला दाखवले होते. मार्च २०१६ मध्ये हा व्यवहार ठरला होता. यामध्ये पहिल्या मजल्यावरील ६०० चौ. फूट क्षेत्रफळाचा फ्लॅट ज्याची किंमत ३८ लाख ४० हजार आणि तळमजल्यावरील १९० चौ. फूट क्षेत्रफळाचे गोडाऊन ज्याची २१ लाख ८५ हजार रुपये एवढी किंमत आहे. या दोन्ही मालमत्तांसाठी ३० जून २०२४ पर्यंत फिर्यादीने संपूर्ण रक्कम अदा केली होती. इतकेच नव्हे तर इलेक्ट्रिक कनेक्शन, मीटर चार्जेस आणि कायदेशीर फी पोटीही स्वतंत्र रक्कम आरोपीने स्वीकारली होती. मात्र, २०१६ पासून ते २०२६ पर्यंत तब्बल १० वर्षांचा कालावधी उलटूनही आरोपीने मालमत्तेचे खरेदीखत करून दिले नाही. वारंवार विनवणी करूनही ताबा न देता, विश्वासघात करून आर्थिक लुबाडणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. खडक पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत हुसेन पठाण याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या आणि आयपीसीच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.

Web Title : फ्लैट, गोदाम के नाम पर महिला से ₹60 लाख की धोखाधड़ी।

Web Summary : एनसीपी पार्षद के भाई पर एक महिला को ₹60 लाख ठगने का मामला दर्ज। पुणे में फ्लैट और गोदाम देने का वादा किया, लेकिन पूरा भुगतान मिलने के बाद भी नहीं दिया। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Woman defrauded of ₹60 Lakh under Flat, Godown pretext.

Web Summary : NCP corporator's brother booked for cheating a woman of ₹60 lakh. He promised a flat and godown in Pune but failed to deliver after receiving full payment. Police are investigating the fraud.