शिरुरमध्ये महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 14:33 IST2023-05-09T14:33:36+5:302023-05-09T14:33:43+5:30

महिलेला हॉस्पिटलमध्ये नेले असता उपचारापुर्वी मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले

Woman commits suicide by hanging herself in Shirur | शिरुरमध्ये महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

शिरुरमध्ये महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

मलठण : शिरुर रामलिंग येथे राहणाऱ्या एका ३३ वर्षीय महिलेने सोमवार (दि ८) रोजी दुपारी चारच्या राहत्या घरात सिलिंग फॅनला साडीच्या साह्याने फाशी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.  अंजली ज्ञानदेव गायकवाड (वय ३३) रा.रामलिंग ता.शिरुर जि पुणे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून याबाबत ज्ञानदेव आप्पासाहेब गायकवाड रा. श्रीगोंदा, ता.श्रीगोंदा जि.अ.नगर यांनी याबाबत शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानदेव गायकवाड यांना (दि ८) रोजी दुपारी ४ च्या च्या दरम्यान त्यांची मुलगी शलाका सुपेकर (रा. श्रीगोंदा) हिने फोन करुन अंजली ज्ञानदेव गायकवाड हिने राहत्या घरात सिलींग फॅनला साडीच्या साह्याने फाशी घेतल्याचे सांगितले. त्यानंतर ते त्यांची पत्नी, मुलगी शलाका सुपेकर यांच्यासह शिरुर येथील वेदांता हॉस्पीटल येथे गेले. त्यावेळी वेदांता हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी त्यांची मुलगी अंजली गायकवाड हिचा उपचारापुर्वी मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी शिरुर पोलिस स्टेशनला धाव घेत फिर्याद दाखल केली.

Web Title: Woman commits suicide by hanging herself in Shirur