पत्नीच्या मित्राला चाकूने भोसकून दहाव्या मजल्यावरून फेकले; पिंपरीतील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 16:04 IST2022-10-28T16:04:27+5:302022-10-28T16:04:58+5:30

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मित्राशी झाला होता वाद

Wife's friend stabbed and thrown from tenth floor Shocking incident in Pimpri | पत्नीच्या मित्राला चाकूने भोसकून दहाव्या मजल्यावरून फेकले; पिंपरीतील धक्कादायक घटना

पत्नीच्या मित्राला चाकूने भोसकून दहाव्या मजल्यावरून फेकले; पिंपरीतील धक्कादायक घटना

पिंपरी : पत्नीच्या मित्राला चाकूने भोकसून दहाव्या मजल्यावरून फेकल्याने त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव निलेश अशोक जार्वेकर (वय ३५) असे आहे. हा प्रकार बुधवारी (दि.२६) रात्री साडेदहाच्या सुमारास मोशी येथे घडला. या प्रकरणी विजयकुमार अशोकराव जोर्वेकर (वय ४०, रा. अहमदनगर) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी पंकज शिंदे (वय ३५, रा. मोशी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने दोन दिवस गावी जातो असे पत्नीला सांगून गेला होता. मात्र, तो पत्नीवर पाळत ठेवून होता. पत्नीचा जवळचा मित्र निलेश तिला भेटण्यासाठी घरी आला असता. आरोपी देखील त्याच्या पाठोपाठ घरात आला. त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत निलेश याच्याशी वाद घातला. टोकदार हत्याराने आरोपीने निलेशला भोसकून दहाव्या मजल्यावरील घराच्या गॅलेरीतून खाली फेकले. यामध्ये निलेश याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Web Title: Wife's friend stabbed and thrown from tenth floor Shocking incident in Pimpri