पत्नी घटस्फोट घेणार; चिडलेल्या पतीकडून भितींवर डोके आपटून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 13:54 IST2025-09-29T13:54:00+5:302025-09-29T13:54:17+5:30

पत्नीने नांदण्यास नकार देऊन घटस्फोट घेणार असल्याचे सांगितल्याने पती चिडला, तिला मारहाण करून भितींवर डोके आपटले

Wife wants divorce; Angry husband attempts to murder wife by hitting her head on the bed | पत्नी घटस्फोट घेणार; चिडलेल्या पतीकडून भितींवर डोके आपटून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न

पत्नी घटस्फोट घेणार; चिडलेल्या पतीकडून भितींवर डोके आपटून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न

पुणे: कौटुंबिक वादातून पत्नीचे भितींवर डोके आपटून खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना धनकवडी भागात घडली. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी पतीविरोधात खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. आराेपी पती घोरपडे पेठेत राहायला आहे. याबाबत आरोपीच्या पत्नीने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा तीन वर्षांपूर्वी तक्रारदार २४ वर्षीय तरुणीशी विवाह झाला होता. विवाहानंतर दाेघे जण घोरपडे पेठेत राहायला होते. मात्र, कौटुंबिक वादामुळे काही दिवसांपूर्वी तरुणी धनकवडीतील माहेरी निघून आली होती. तिने नांदण्यास नकार दिला होता. त्यामुळे आरोपी पती तिच्यावर चिडला होता. शनिवारी (दि. २७) सकाळी पती माहेरी आला. पत्नीने नांदण्यास नकार देऊन घटस्फोट घेणार असल्याचे सांगितल्याने तो चिडला. त्यानंतर पतीने तिला मारहाण करून भितींवर डोके आपटले. तिचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक विशाल पवार पुढील तपास करत आहेत.

Web Title: Wife wants divorce; Angry husband attempts to murder wife by hitting her head on the bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.