पुण्यात चारित्र्याच्या संशयावरून इंजिनीयर पतीकडून पत्नीचा चाकूने वार करून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 12:39 IST2022-12-05T12:37:12+5:302022-12-05T12:39:57+5:30

आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे...

Wife murdered by engineer husband over suspicion of character in Pune; Within Hadapsar Police Station limits | पुण्यात चारित्र्याच्या संशयावरून इंजिनीयर पतीकडून पत्नीचा चाकूने वार करून खून

पुण्यात चारित्र्याच्या संशयावरून इंजिनीयर पतीकडून पत्नीचा चाकूने वार करून खून

पुणे / किरण शिंदे:  पुण्यातील हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत आज सकाळी खुनाचा प्रकार उघडकीस आला. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीनेच चाकूने वार करून पत्नीचा खून केला. फुरसुंगीतील भेकराईनगरमध्ये आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ज्योती राजेंद्र गायकवाड (वय 28) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी राजेंद्र भाऊराव गायकवाड (वय 31) याला ताब्यात घेतले आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, भेकराई नगर मधील गुरुदत्त कॉलनी भक्तनिवास या ठिकाणी गायकवाड दांपत्य राहत होते. राजेंद्र गायकवाड हा इंजिनियर म्हणून काम करतो. दरम्यान राजेंद्र गायकवाड हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. याच कारणावरून दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून दोघात भांडण सुरू होते. आज सकाळी सुद्धा याच कारणावरून त्यांच्यात वाद झाले. रागाच्या भरात राजेंद्र याने चाकूने पत्नीवर वार केले.. गंभीर जखमी झाल्याने ज्योती गायकवाड यांचा मृत्यू झाला. 

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी ज्योती गायकवाड यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. तर आरोपी राजेंद्र गायकवाड याला ताब्यात घेतले आहे. हडपसर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Wife murdered by engineer husband over suspicion of character in Pune; Within Hadapsar Police Station limits