पुणे: कौटुंबिक वादातून पोलिसांकडे तक्रार दिल्याने एकाने पत्नीचा दोरीने गळा आवळून तिचा खुनाचा प्रयत्न केल्याची घटना हडपसरमधील महंमदवाडी परिसरात घडली. याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. अनिल पंढरीनाथ माने (४२, रा. साठेनगर, तरवडे वस्ती, महंमदवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत माने याची पत्नी जया (३५) हिने काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिल आणि त्याच्या पत्नीत कौटुंबिक कारणावरून वाद व्हायचे. वादातून पत्नीने पोलिसांकडे तक्रार दिली होती. सोमवारी (दि. २२) सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्यात पुन्हा वाद झाले. वादातून अनिलने पत्नीचा दोरीने गळा आवळला, तसेच डोक्यात गज मारला. या घटनेत ती गंभीर जखमी झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस उपनिरीक्षक विनायक गुरव पुढील तपास करत आहेत.
Web Summary : In Pune, a husband attempted to murder his wife by strangling her after she filed a police complaint due to domestic disputes. The husband has been arrested, and the wife is seriously injured, receiving treatment.
Web Summary : पुणे में, घरेलू विवादों के कारण पुलिस शिकायत दर्ज कराने के बाद एक पति ने अपनी पत्नी का गला घोंटकर हत्या करने का प्रयास किया। पति को गिरफ्तार कर लिया गया है, और पत्नी गंभीर रूप से घायल है, जिसका इलाज चल रहा है।