पत्नी सासरी नांदायला येत नाही; रागातून पतीने जाळली पत्नीची दुचाकी, पुण्यातील खळबळजनक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 16:35 IST2026-03-23T16:34:10+5:302026-03-23T16:35:26+5:30

रागाच्या भरात पेट्रोल टाकून पत्नीची दुचाकी काडी लावून पेटवून दिली, या आगीत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली असून पतीला अटक करण्यात आली आहे

Wife does not come to visit her in-laws; Husband burns wife's bike in anger, sensational incident in Pune | पत्नी सासरी नांदायला येत नाही; रागातून पतीने जाळली पत्नीची दुचाकी, पुण्यातील खळबळजनक घटना

पत्नी सासरी नांदायला येत नाही; रागातून पतीने जाळली पत्नीची दुचाकी, पुण्यातील खळबळजनक घटना

पुणे: लग्नानंतर काही दिवस सासरी राहून माहेरी निघून गेलेल्या पत्नीला पती सातत्याने नांदायला ये म्हणून सांगत होता. तिने नकार दिल्याच्या रागातून पतीने सोसायटीच्या आवारात उभ्या असलेल्या पत्नीच्या दुचाकीवर मध्यरात्री पेट्रोल टाकून जाळून टाकली. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. राजकुमार इरन्ना सुतार (वय २७, रा. समर्थनगर, सिंहगड रोड) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत श्वेता विजय काटकर (वय २७, रा. सद्गुरू गॅलेक्सी अपार्टमेंट, दांगट इंडस्ट्रियल कमान, शिवणे) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना रविवारी (दि. २२) मध्यरात्री १ वाजून १७ मिनिटांनी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वेता काटकर आणि राजकुमार सुतार यांचे लग्न झाले आहे. लग्नानंतर श्वेता या तीन महिने सासरी राहिली. त्यानंतर त्यांच्यात वाद झाल्याने माहेरी निघून आली. गेल्या दीड वर्षापासून ते विभक्त राहत आहेत. राजकुमार सुतार हा पत्नीला सासरी नांदायला ये म्हणून सांगण्यास त्यांच्या घरी गेला होता. त्यावेळी त्यांनी नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात त्याने पेट्रोल टाकून श्वेता यांची दुचाकी काडी लावून पेटवून दिली. या आगीत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. पोलिसांनी राजकुमार सुतार याला अटक केली असून, पोलिस उपनिरीक्षक सुनील जगदाळे पुढील तपास करीत आहेत.

 

Web Title : पत्नी के इनकार पर पति ने जलाई स्कूटी, पुणे में सनसनी

Web Summary : पत्नी के घर लौटने से इनकार करने पर पुणे में एक व्यक्ति ने उसकी स्कूटी जला दी। शादी के तीन महीने बाद विवाद के चलते वे अलग रह रहे थे। आरोपी पति राजकुमार सुतार को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है।

Web Title : Husband burns wife's scooter after she refuses to return.

Web Summary : Infuriated by his wife's refusal to return home, a Pune man torched her scooter. The couple had been living separately for a year and a half after arguments following three months of marriage. Police arrested the husband, राजकुमार सुतार.