पत्नी व प्रियकराने संगनमताने केला पतीचा खून; दोन तासात पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 03:12 PM2023-10-25T15:12:14+5:302023-10-25T15:13:05+5:30

पत्नीच्या प्रियकराकडून जीवाला धोका असलयाचे पती सतत सांगत होता

Wife and lover conspired to kill husband In two hours the police caught the accused | पत्नी व प्रियकराने संगनमताने केला पतीचा खून; दोन तासात पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या

पत्नी व प्रियकराने संगनमताने केला पतीचा खून; दोन तासात पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या

इंदापूर : अनैतिक प्रेमसंबंधास विरोध करणा-या पतीचा प्रियकराने केलेल्या खुनी हल्ल्यात मृत्यू झाला. या प्रकरणी त्याची पत्नी, प्रियकर व त्याचा साथीदार या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पिनेश उर्फ मयुर महेंद्र धाईंजे ( रा.टेंभुर्णीवेस नाका परिसर, इंदापूर),विजय नवनाथ शेंडे (रा. अंबिकानगर इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. ईश्वर भीमराव कांबळे (रा.टेंभुर्णीवेस नाका, इंदापूर) असे मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे. त्याचे वडील भीमराव सुदाम कांबळे (वय ६० वर्षे, रा.आंबेगाव कुबेर प्रॉपर्टीज ता.हवेली जि. पुणे) यांनी फिर्याद दिली होती.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईश्वर हा फिर्यादी भीमराव कांबळे यांचा थोरला मुलगा होता. त्यास दोन मुले आहेत. दीड वर्षापुर्वी ईश्वरच्या पत्नीने सासरच्या लोकांबरोबर भांडण केले. त्यानंतर ती नवरा व मुलांसह आपल्या माहेरी बाभुळगाव ( ता. इंदापूर) येथे आली. काही दिवसानंतर ती नव-यासह इंदापूरमधील टेंभुर्णी वेस नाका परिसरात भाड्याच्या घरात राहू लागली. शेजारी राहणाऱ्या पिनेश उर्फ मयुर महेंद्र धाईंजे याच्याबरोबर तिचे अनैतिक संबंध निर्माण झाले. या संदर्भात ईश्वरने फिर्यादीस कल्पना दिली होती. ही बाब फिर्यादीने सुनेच्या आईवडिलांच्या कानावर घातली होती. पिनेशला ही समजावुन सांगितले होते. मात्र पिनेश किंवा त्या विवाहितेच्या वर्तनात काहीच फरक पडलेला नव्हता. ईश्वर ही पिनेशकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे सतत सांगत होता.
    
या पार्श्वभूमीवर दि.२३ ऑक्टोबरच्या रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पिनेश धाईंजे व विजय शेंडे यांनी संगनमत केले. अनैतिक संबंधाच्या कारणावरुन घरी जाऊन ईश्वरबरोबर वाद घालून त्याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पिनेशने त्याच्या हातातील धारदार शस्त्राने ईश्वराच्या पोटावर वार करुन त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर ते तिघे ही तेथून निघुन गेले. जखमी ईश्वरला त्याच्या नातेवाईकांनी पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरु असताना आज (दि.२५) सकाळी त्याचा मृत्यू झाला.

गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन तासात अकलूज ( ता. माळशिरस, जि.सोलापूर) कडे पळालेल्या तीन ही आरोपींना इंदापूर पोलीसांनी पकडले. यातील विवाहिता जखमी असल्याने तिला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. फिर्याद दिल्यानंतर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होता. त्यामध्ये बदल करुन खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. - दिलीप पवार, पोलीस निरीक्षक, इंदापूर पोलीस ठाणे

Web Title: Wife and lover conspired to kill husband In two hours the police caught the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.