पुणे महापालिकेच्या आर्थिक नाड्या कोणाच्या हातात? स्थायी समिती सदस्यांकडे सर्वांचे लक्ष, आज होणार निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 09:23 IST2026-02-13T09:23:05+5:302026-02-13T09:23:13+5:30

महापालिकेच्या आर्थिक नाड्या असलेल्या स्थायी समित्यांवर आपली वर्णी लागावी, यासाठी भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांकडून प्रयत्न सुरू होते

Who is in charge of the financial affairs of Pune Municipal Corporation? All eyes are on the standing committee members, the election will be held today | पुणे महापालिकेच्या आर्थिक नाड्या कोणाच्या हातात? स्थायी समिती सदस्यांकडे सर्वांचे लक्ष, आज होणार निवड

पुणे महापालिकेच्या आर्थिक नाड्या कोणाच्या हातात? स्थायी समिती सदस्यांकडे सर्वांचे लक्ष, आज होणार निवड

पुणे : महापालिकेच्या स्थायी समितीसह विविध विषय समित्यांच्या सदस्यांची शुक्रवारी (दि.१३) दुपारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत निवड होणार आहे. महापालिकेच्या आर्थिक नाड्या असलेल्या स्थायी समितीवर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महापालिका निवडणुकीत पुणेकरांनी ११९ नगरसेवक निवडून देत भाजप स्पष्ट बहुमत दिले आहे. पुण्याचे महापौर आणि उपमहापौरपद भाजप नगरसेविका व नगरसेवकास मिळणार हे निश्चित होते. मात्र, या दोन्ही पदावर भाजप कोणाला संधी देणार याकडे याबाबत उत्सुकता होती. अखेर भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या मंजूषा नागपुरे यांना महापौरपदाची संधी दिली. तसेच रिपाइं आठवले गटाचे परशुराम वाडेकर यांना उपमहापौरपदी संधी दिली.

महापालिकेच्या आज दुपारी ३ वाजता होणाऱ्या सर्वसाधारण सभेत स्थायी, शहर सुधारणा, शिक्षण, महिला व बालकल्याण, विधि, क्रिडा आणि नाव या सात समित्यांच्या सदस्यांची निवड केली जाणार आहे. या समित्यांवर नगरसेवकांच्या संख्येनुसार सदस्यांची निवड होणार आहे. स्थायी समितीवर एकूण १६ सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये भाजप १२, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ३ आणि काँग्रेस १ अशा सदस्यांची नियुक्ती होणार आहे. तसेच इतर सहा समित्यांवर प्रत्येकी १३ सदस्यांची नियुक्ती होणार आहे. यामध्ये भाजप १०, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) २ आणि काँग्रेस १ अशा सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. समित्यांच्या सदस्यांची निवड झाल्यानंतर आठवडाभरात समित्यांच्या अध्यक्षांची निवड होणार आहे. दरम्यान, महापालिकेच्या आर्थिक नाड्या असलेल्या स्थायी समित्यांवर आपली वर्णी लागावी, यासाठी भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांकडून प्रयत्न सुरू होते. या यामध्ये कोणाच्या प्रयत्नास यश आले, हे आज स्पष्ट होणार आहे.

Web Title : पुणे महानगरपालिका: आर्थिक नियंत्रण किसके हाथ में? आज चुनाव।

Web Summary : पुणे महानगरपालिका आज समिति सदस्यों का चुनाव करेगी, जिसमें वित्त नियंत्रण करने वाली स्थायी समिति पर ध्यान केंद्रित किया जाएगा। भाजपा का दबदबा है, महापौर जैसे प्रमुख पद पहले से ही सुरक्षित हैं। चुनाव तय करेगा कि पुणे के आर्थिक भविष्य को कौन प्रभावित करता है।

Web Title : Pune Municipal Corporation: Who Controls the Purse Strings? Today's Election.

Web Summary : Pune Municipal Corporation elects committee members today, focusing on the powerful Standing Committee controlling finances. BJP dominates, with key positions like mayor already secured. The election determines who influences Pune's economic future.