तानाजी सावंत यांच्या मुलासोबत बँकॉकला जाणारे ते दोघं कोण? नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 09:08 IST2025-02-11T09:07:59+5:302025-02-11T09:08:38+5:30

माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सामंत यांचे काल अपहरण झाल्याची बातमी समोर आली होती. आता या प्रकरणात नवीन खुलासा समोर आला आहे.

Who are the two people going to Bangkok with Tanaji Sawant's son? What's the real story? | तानाजी सावंत यांच्या मुलासोबत बँकॉकला जाणारे ते दोघं कोण? नेमकं प्रकरण काय?

तानाजी सावंत यांच्या मुलासोबत बँकॉकला जाणारे ते दोघं कोण? नेमकं प्रकरण काय?

Tanaji Sawant ( Marathi News ) : माजी मंत्री तानाजी सावंत ( Tanaji Sawant ) यांचा मुलगा ऋषीराज सावंत ( Rishikesh Sawant ) यांचे काल पुण्यातून अपहरण झाल्याची बातमी समोर आली होती. या बातमीमुळे एकच खळबळ उडाली होती, पण काही तासानंतर ऋषीराज सावंत हे त्याच्या मित्रांसोबत बँकॉकला जात असल्याची माहिती समोर आली. माजी मंत्री सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. दरम्यान, ऋषीराज सावंत यांच्यासोबत आणखी दोन मित्र कोण होते. याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. यावर आता विमान कंपनीचे एक तिकिट व्हायरल झाले आहे, या तिकीटामधून त्या दोन मित्रांची नावे समोर आली आहेत. 

लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीत खडखडाट?; कंत्राटदारांचे ९० हजार कोटी थकवले

 ऋषीराज सावंत ( Rishikesh Sawant ) काल पुण्याहून एका खासगी चार्टर फ्लाईटने बँकॉकसाठी निघाले होते. यावेळी त्यांच्यासोबत आणखी दोन मित्र होते. सावंत यांच्यासोबत प्रवीण उपाध्याय आणि संदीप वासेकर हे देन मित्र होते. ऋषीकेश सावंत यांना एका कारने पुणे विमानतळावर सोडण्यात आले, यानंतर ते एका चार्टर फ्लाईटने बँकॉकसाठी निघाले. याबाबत त्या कार चालकाने माजी मंत्री तानाजी सावंत यांना माहिती दिली. मुलाने याबाबत सावंत यांना आधी कोणतीही माहिती दिली नव्हती, त्यामुळे  सावंत यांच्या संस्थेतील एका अधिकाऱ्याने पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दिली होती.

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस यंत्रणा अॅक्शनमोडमध्ये आली आणि पुण्याहून निघालेल्या चार्टर फ्लाईटची माहिती घेतली. पोलिसांनी ते विमान चेन्नईमध्ये उतरवल्याची माहिती समोर आली आहे. ऋषीकेश सावंत याचे अपहरण झाले नसून तो मित्रांसोबत बँकॉकला फिरायला गेल्याची माहिती माजी मंत्री तानाजी सावंत ( Tanaji Sawant ) यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. 

तानाजी सावंत यांनीच दिली मुलाविषयी माहिती

तानाजी सावंत ( Tanaji Sawant ) म्हणाले, माझा मुलगा कुठल्याही अनोळखी मुलांसोबत नाही तर तो त्याच्या मित्रांसोबत आहे. तो बेपत्ता झाला किंवा त्याचे अपहरण झाले असा कुठलाही प्रकार नाही. दरम्यान तो रोज घरातून बाहेर जाताना आम्हाला सांगून जातो. मात्र आज असे काही झाले नाही त्यामुळे आम्हाला चिंता वाटली. माझा मुलगा आणि मी दिवसातून पंधरा ते वीस वेळेस फोनवर बोलत असतो. किंवा तो घरातून बाहेर जाताना मोठ्या मुलाला सांगत असतो. आज मात्र तो आम्हाला न सांगता दुसऱ्याच गाडीतून मित्रांसोबत विमानतळावर गेला असल्याचे चालकाने आम्हाला सांगितले. त्यामुळे चिंता वाटू लागल्याने मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुणेपोलिसांना याची माहिती दिली. सध्या तो खाजगी विमानातून प्रवास करत असल्याची माहिती आहे. तो नेमका कुठे जात आहे, त्याच्यासोबत आणखी कोण कोण आहेत याविषयी कुठलीही माहिती नाही, असं काल सावंत यांनी सांगितले होते. 

Web Title: Who are the two people going to Bangkok with Tanaji Sawant's son? What's the real story?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.