कुजबुज सदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:12 IST2021-09-26T04:12:25+5:302021-09-26T04:12:25+5:30

राज्यात प्रशासनावर वचक असलेला व दादांना भेटलं तर काम होणार असेल तर लगेच मार्गी लागते, असा दबदबा असलेला नेता ...

Whisper Sadar | कुजबुज सदर

कुजबुज सदर

राज्यात प्रशासनावर वचक असलेला व दादांना भेटलं तर काम होणार असेल तर लगेच मार्गी लागते, असा दबदबा असलेला नेता म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार. खासगी कामानिमित्त नेहमीच अनेक लोक पवार यांना भेटतात. शुक्रवारी कोरोना आढावा बैठक संपल्यानंतर असेच अनेक लोक त्यांना भेटत होते. एका क्लबच्या कामासाठी एक व्यक्ती अजित पवारांना भेटली. त्याने ‘दादा, माझे काम झालेले नाही,’ असे सांगितले. यावर पवार चांगलेच चिडले. ‘मी काम करतो म्हणून लोक मला भेटतात. माझ्याकडे लोकांची गर्दी काय अशीच होत नाही. तू काय थापा मारतो?’ तुझ्या फाईलवर सही झाली असल्याचे त्याला सांगत त्यांनी थेट संबंधित सचिवाला फोन लावला. त्यांनीदेखील फायलीवर सही झाल्याचे सांगितले. यामुळे उपस्थित लोकांना पुन्हा एकदा दादांच्या कामाची झलक पाहायला मिळाली.

Web Title: Whisper Sadar