Video: अशा महान लोकांचं काय करावं! चक्क रिक्षांची चाके चोरली, पुण्याच्या मार्केटयार्डातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 11:29 IST2025-02-20T11:29:16+5:302025-02-20T11:29:49+5:30

चोरी पाहून रिक्षाचालकांनी डोक्याला हातच लावला असून हे चोर चाकं घेऊन पुढं त्यांचं काय करणार? असा सवाल रिक्षाचालकांनी उपस्थित केला आहे

What to do with such great people! They even stole the wheels of rickshaws, the incident in Pune's market yard | Video: अशा महान लोकांचं काय करावं! चक्क रिक्षांची चाके चोरली, पुण्याच्या मार्केटयार्डातील प्रकार

Video: अशा महान लोकांचं काय करावं! चक्क रिक्षांची चाके चोरली, पुण्याच्या मार्केटयार्डातील प्रकार

पुणे: पुणे शहरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दिवसाढवळ्या घरफोड्या, चेन स्नॅचिंग, रस्त्यात अडवून लुटणे अशा घटना सातत्याने घडतायेत. अशातच चोरांनी चोरी करण्याचा मोठा पराक्रम केलाय. चोरट्यांनी पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या तीन रिक्षांची चाकेच चोरून नेली आहेत. अशा महान चोरांचं काय करावं असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.  

पुण्यातील मार्केटयार्ड मधून हा चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी पार्किंगमध्ये उभा केलेल्या तीन रिक्षांची चाके चोरून नेली. रात्रीच्या वेळी ही घटना घडल्याचे समोर आले आहे. मागील काही दिवसांपासून शहरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. घरफोड्या, चेन स्नॅचिंग, रस्त्यात अडवून लुटणे, महिलांना फसवून सोनसाखळी चोरणे, अशा घटना घडत आहेत. आता आणखी एक खळबळजनक चोरीचा प्रकार उघडकीस आल्याने पोलिसांचा ताप वाढला आहे. 

चाके चोरून काय करणार?

मार्केटयार्ड भागातील विचित्र प्रकारची चोरी पाहून रिक्षाचालकांनी डोक्याला हातच लावला. हे चोर चाकं घेऊन पुढं त्यांचं काय करणार? असा सवाल चालकांनी उपस्थित केला आहे. पोलीस तरी त्या चोरांना पकडून काय करणार? अशी प्रतिक्रिया चालकांनी दिली आहे.  

Web Title: What to do with such great people! They even stole the wheels of rickshaws, the incident in Pune's market yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.