शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

त्यांचा साहित्याशी काय संबंध?

By admin | Updated: October 30, 2015 00:24 IST

अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल अशोक वाजपेयी बोलत आहेत; पण त्यांचा साहित्याशी संबंध काय, साहित्य क्षेत्रात योगदान काय

पुणे : अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल अशोक वाजपेयी बोलत आहेत; पण त्यांचा साहित्याशी संबंध काय, साहित्य क्षेत्रात योगदान काय, असा थेट सवाल ज्येष्ठ साहित्यिक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी उपस्थित केला. कलबुर्गी यांची झालेली हत्या दुर्दैवी आहे. माझ्यावरही शाब्दीक हल्ले झाले, सनातनी ठरविले गेले. कर्नाटकात कॉँग्रेसेचे राज्य आहे, दादरीत डाव्या विचारसरणीचे राज्य आहे. असे असताना या घटनांना मोदी जबाबदार कसे, असेही ते म्हणाले.अक्षरधाराने आयोजित केलेल्या ५५०व्या दीपावली शब्दोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी भैरप्पा यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या या सोहळ्यात कन्नड अनुवादिका उमा कुलकर्णी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. उद्घाटन समारंभास प्रा. मिलिंद जोशी, डॉ. सदानंद बोरसे, डॉ. नरसिंह मांकडे उपस्थित होते.दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांची हत्या झाली. त्या पार्श्वभूमीवर काही साहित्यिकांनी साहित्य अकादमीचे पुरस्कार परत केले. सध्याचे वातारवण बघता साहित्यिकांनी काय करावे, या प्रश्नाला उत्तर देताना भैरप्पा म्हणाले, ‘‘देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डाव्या विचारसरणीचे राज्य आले. पंडित नेहरू डाव्या विचारसरणीचे होते. डाव्या विचारसरणीची कार्यपद्धती अवलंबली गेली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करून नेहरूंची नातलग नयनतारा सेहगल यांनी पुरस्कार परत केला. त्यानंतर अनेक साहित्यिकांनी पुरस्कार परत केले. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अर्जुनसिंह यांचे जवळचे असलेले अशोक वाजपेयी बोलत आहे. त्यांचे साहित्यात काय योगदान आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्या-त्या राज्यांची आहे. त्यामुळे या दुर्दैवी घटनांना मोदी जबाबदार कसे?डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या ‘पारखा’ या कादंबरीचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. सुप्रिया सहस्त्रबुद्धे यांनी या कादंबरीविषयी विवेचन केले. डॉ. मांडके, डॉ. बोरसे, प्रा. जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. सुरुवातीस अक्षरधाराच्या संचालिका रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन सिद्धार्थ बेंद्रे यांनी केले. (प्रतिनिधी)