Black Box: ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? अनेक महत्वाच्या गोष्टी होतात रेकॉर्ड, स्कॉड्रन लीडरची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 13:35 IST2026-02-05T13:35:13+5:302026-02-05T13:35:31+5:30

विमान उतरायला जो तुम्हाला पॅरामीटर हवा आहे. तसेच दिशा काय होती, आणि बाकी सुद्धा जे विमानाचे इंजिन, स्पीड काय होतं या सगळ्या गोष्टी तिथे रेकॉर्ड केल्या जातात

What is a black box? Many important things are recorded, information about the squadron leader | Black Box: ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? अनेक महत्वाच्या गोष्टी होतात रेकॉर्ड, स्कॉड्रन लीडरची माहिती

Black Box: ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? अनेक महत्वाच्या गोष्टी होतात रेकॉर्ड, स्कॉड्रन लीडरची माहिती

पुणे : 28 जानेवारीला बारामतीत झालेल्या विमानअपघातातअजित पवारांचा मृत्यू झाला. या विमानअपघाताची कारण शोधण्यासाठी सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे विमानाचा ब्लॅक बॉक्स आहे. या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स 29 जानेवारी रोजी बारामती विमानतळ परिसरात हस्तगत करण्यात आला. तर हा ब्लॅक बॉक्स म्हणजे नेमकं काय असतं? आणि तो किती महत्त्वाचा असतो? याचीच माहिती स्कॉड्रन लीडर अजय परांजपे यांनी दिली आहे. 

परांजपे म्हणाले, पहिलं मी सांगू इच्छितो की, तो खरा रंग ऑरेंज असतो. पण त्याला ब्लॅक का म्हणतात? अजून मलाही कोडं आहे. पण तो रंग ऑरेंज असतो कारण की, जेव्हा चुकून एखाद्या विमान अपघातात तो बॉक्स बाहेर फेकला जातो. तेव्हा जंगलात पडला तर हिरव्या जंगलामध्ये ऑरेंज रंग पटकन दिसतो. तसेच तो आगीत नष्ट होऊ नये किंवा जर विमान पाण्यात पडलं तर ते ब्लॅक बॉक्समध्ये पाणी जाऊन काही होऊ नये. म्हणून समुद्राच्या खाली गेला तर त्याच्यावर दबाव वाढतो पाण्याचा तर दबाव सहन करण्याचं सगळं त्याच्यात डिझाईन असते. कारण त्याच्यातच सगळी स्टोरी लपलेली असते. 

आता त्या बॉक्सचे दोन तुकडे असतात. एक ज्यामध्ये डेटा रेकॉर्ड केला जातो. तर तो डेटा म्हणजे काय? प्रत्येक क्षणी विमानाची उंची किती होती? विमानाची दिशा काय होती? इंजिन काय करत होतं? ऍक्शन काय घेतलं? त्यामध्ये हा प्रत्येक डेटा रेकॉर्ड केला जातो. आता त्यामध्ये कॅटेगरी असतात. जे मोठी विमानं असतात त्याच्यात जास्त डेटा रेकॉर्ड होतो. छोट्या विमानात कमी डेटा रेकॉर्ड होतो. दुसरी एक गोष्ट महत्वाची म्हणजे एक रेकॉर्डर असतो. त्यामध्ये आसपास बोललेलं सगळं काही रेकॉर्ड होतं. पायलटने हेडफोन काढून आपापसात काही बोलले तर ते पण तिथे रेकॉर्ड होतं. त्यामुळे त्या कॉकपीट मध्ये शेवटचा अर्धा तास किंवा एक तासात काय घडलं असेल. त्याचा आवाज पण तुम्हाला ऐकू येतो. त्यामुळे ह्या दोन गोष्टींचा पुरावा घेऊन तो टाईम लाईन वर जोडला जातो. विमान किती वाजता टेक ऑफ झालं. तेव्हा लाईट किती होती. विमान उतरायला जो तुम्हाला पॅरामीटर हवा आहे. तसेचा दिशा काय होती. आणि बाकी सुद्धा जे विमानाचे इंजिन, स्पीड काय होतं या सगळ्या गोष्टी तिथे रेकॉर्ड केल्या जातात. ज्या आपल्याला काढता येतात. त्यामुळे या बॉक्सचे अतिशय महत्व आहे. 

Web Title : ब्लैक बॉक्स: यह क्या है और दुर्घटनाओं में यह क्यों महत्वपूर्ण है।

Web Summary : ब्लैक बॉक्स, वास्तव में नारंगी रंग का, ऊंचाई, दिशा, इंजन प्रदर्शन और कॉकपिट ऑडियो जैसे महत्वपूर्ण उड़ान डेटा रिकॉर्ड करता है। यह डेटा जांचकर्ताओं को दुर्घटना के कारणों को समझने के लिए महत्वपूर्ण सबूत प्रदान करता है।

Web Title : Black Box: What it is and why it's crucial in accidents.

Web Summary : A black box, actually orange, records vital flight data like altitude, direction, engine performance, and cockpit audio. This data helps investigators piece together the events leading to an accident, providing crucial evidence for understanding the cause.