शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
3
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
4
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
5
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
6
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
7
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
8
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
9
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
10
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
11
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
12
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
13
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
14
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
15
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
16
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
17
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
18
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
19
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
20
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!

धनगर समाजाची फसवणूक करतायत की काय? गणपतराव देशमुख यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 20:12 IST

उरलेले आयुष्य राज्यातील दुष्काळ हटवण्यासाठी आणि धनगर आरक्षण मिळण्याच्या प्रश्नासाठी : आमदार गणपतराव देशमुख

ठळक मुद्देशनिवार वाड्यावर ‘धनगर माझा सन्मान सोहळा’ धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही

पुणे : कारण नसताना मंत्रिमंडळातील एका ज्येष्ठ नेत्याने कायद्यात दुरुस्ती न करता सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा केली. यावर जास्त टिप्पणी करणार नाही; मात्र, धनगर समाजाची फसवणूक करतात की काय अशी शंका येत असल्याची खंत ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख यांनी व्यक्त केली. तसेच उरलेले आयुष्य राज्यातील दुष्काळ हटवण्यासाठी आणि धनगर आरक्षण मिळण्याच्या प्रश्नासाठी आहे. यासाठी जे काही करावे लागेल ते करेल, असेही ते म्हणाले.पुणे येथील ऐतिहासिक अशा शनिवारवाडा पटांगणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९३ वी जयंती व धनगर माझाच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त ‘धनगर माझा सन्मान सोहळा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी देशमुख यांना ‘धनगर माझा जीवन गौरव पुरस्कार’देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी सन्मानाला उत्तर देताना ते बोलत होते.  या वेळी जलसंधारण तथा राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे ,आमदार रामराव वडकूते, अ‍ॅड. रामहरी रूपनवर, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, माजी आमदार पोपटराव गावडे, गोपीचंद पडळकर, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष उत्तम जानकर, यशवंत सेनेचे माधव गडदे, आॅल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रवीण काकडे, ज्येष्ठ पत्रकार शामसुंदर सोन्नर,  प्रा. शिवाजी दळणर, राजू दुर्गे, घनशाम हाके, रासपाचे बाळासाहेब दोलताडे, उज्ज्वला हाके, अर्जुन सलगर, तुकाराम काळे आदी मान्यवर उपस्थित होते.या पुरस्काराने मी भारावून गेलो आहे. हा सन्मान माझा नसून, दुष्काळी भागातील जनतेने दिलेल्या आशीर्वादाचा सत्कार आहे, अशी भावना देशमुख यांनी व्यक्त केली. धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटल्याशिवाय राहाणार नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पुणे व पिंपरी-चिंचवड एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी पांडुरंग पोळे, मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त संगीता धायगुडे, उद्योजक रमेशशेठ लबडे, अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, भूमापन क्षेत्र अधिकारी अनिल विष्णू राऊत, जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहूजी शेवाळे, युवा उद्योजक मारुती दिगंबर येडगे, सुधाई सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा वैशाली सुनील कुºहाडे, ईश्वरकृपा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा साधना संभाजी गावडे या सर्वांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच जयश्री श्रावण वाकसे व युवा उद्योजक विवेक बिडगर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. धनगर माझाचे संपादक धनंजय तानले यांनी प्रास्ताविक, तर गणेश खामगळ यांनी आभार मानले.

टॅग्स :Puneपुणेshanivar wadaशनिवारवाडाGanpatrao Deshmukhगणपतराव देशमुख