लग्न कार्यासाठी फलटणला गेले; पुण्याला येताना पोहण्याचा मोह आवरला नाही, २१ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 11:16 IST2025-04-21T11:14:56+5:302025-04-21T11:16:40+5:30

निरा डावा कॅनॉलमध्ये पोहण्यासाठी सर्व मित्र पोहण्यासाठी उतरले असता एकाचा पाय घसरल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला

Went to Phaltan for a wedding function couldn't resist the temptation to swim while returning to Pune 21-year-old youth drowns to death | लग्न कार्यासाठी फलटणला गेले; पुण्याला येताना पोहण्याचा मोह आवरला नाही, २१ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

लग्न कार्यासाठी फलटणला गेले; पुण्याला येताना पोहण्याचा मोह आवरला नाही, २१ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

सोमेश्वरनगर : हडपसर-भेकराईनगर येथील चार मित्र फलटण येथे लग्नकार्यासाठी आले होते. परत जाताना निंबुत नजीक निंबुत छपरी येथे पोहण्यासाठी उतरले असताना यातील एकाचा कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.  याबाबत निखिल रमेश कुन्हाडे  रा. काहेपडळ भेकराईनगर हडपसर पुणे याने वडगाव निंबाळकर पोलीसात माहिती दिली आहे. 
      
याबाबत माहिती अशी की, आज दिनांक २० रोजी भेकराईनगर-हडपसर येथील तुषार पोपट खेडकर, गौरव गजानन भोसले, मंगेश कैलास शेळके व  सुरज रामदास चौगुले हे दोन मोटार सायकलवरून फलटण येथे लग्न असल्याने फलटण येथ गेले होते. लग्न झाल्यानंतर सायंकाळी साडेचार वाजता फलटण येथुन निघुन पुण्याला येताना सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास निरा डावा कॅनॉलमध्ये पोहण्यासाठी सर्व मित्र उतरले. पोहत असताना तुषार पोपट खेडकर (वय २१) याचा पाय घसरल्याने तो पाण्यात वाहत जाऊन पाण्यात बुडाला. तेथील लोकांच्या मदतीने पाण्याचे बाहेर काढण्यात आले. त्याला साई सेवा हॉस्पीटल वाघळवाडी येथे असता तेथील डॉक्टरांनी तपासून तो मृत्यू झाल्याचे सांगितले आहे.

Web Title: Went to Phaltan for a wedding function couldn't resist the temptation to swim while returning to Pune 21-year-old youth drowns to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.